ETV Bharat / city

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय घडामोडींवर दीड तास चर्चा - संजय राऊत बातमी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भेट घेतली. पवार यांच्याशी आज सकाळी 'सिल्वर ओक' बंगल्यावर आपली ही भेट झाली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून दिली आहे.

Sanjay Raut met Sharad Pawar
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
author img

By

Published : Oct 10, 2020, 8:13 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भेट घेतली. पवार यांच्याशी आज सकाळी 'सिल्वर ओक' बंगल्यावर आपली ही भेट झाली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली. विशेषत: बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली आहे.

  • देशाचे आदरणीय नेते श्री.शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्र आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. मा.@PawarSpeaks यांच्याशी होणारा संवाद नेहमीच मार्गदर्शक असतो.
    जय महाराष्ट्र

    — Sanjay Raut (@rautsanjay61) October 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी येथे होत असलेली विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यासाठीची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - पडळकरांच्या टिकेनंतर आमदार रोहित पवारांचा पलटवार; म्हणाले...

दरम्यान, राऊत यांनी आपली शरद पवार यांच्यासोबत भेट झाली असल्याची ट्विट करून त्यासंदर्भातील माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणतात की, देशाचे आदरणीय नेते शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्र आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. पवार यांच्याशी होणारा संवाद नेहमीच मार्गदर्शक असतो, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाविकास आघाडीकडून राज्यात लवकरच विविध महामंडळाच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तर दुसरीकडे राज्यपालांकडूनही 12 नामनियुक्त सदस्यांचा विषय मार्गी लागण्याची शक्यता असल्याने पवार-राऊत ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर एक आढावा घेण्यात आला होता. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी उद्योग, व्यवसाय सुरू राहिले पाहिजेत. यासाठी महाविकास आघाडीकडून पाऊल उचलले जात असताना राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा दिलासा कसा मिळेल, विकासकामे पुन्हा सुरू केली जावीत, या दोन्ही नेत्यांमध्ये आज चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.