मुंबई - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सपत्नीक शरद पवारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर राऊत राजभवनावर दाखल -
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी सपत्नीक शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांच्या घरी गेलो होतो असे सांगितले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे दोन शिल्पकार भेटत असतील तर राजकीय चर्चा तर नक्कीच होणार. कारण आर्यन खान प्रकरणावरती नबाव मलिक यांनी ट्रेलर दाखवला. आता त्याची पुढची पटकथा मी सांगणार, असे संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले होते.
राजभवनावर जाण्याचे सांगितले 'हे' कारण -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले होते. संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावर बोलताना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज्यपालांना भेटले अशी माहिती दिली आहे.
राऊतांनंतर वानखेडे कुटुंबीय राजभवनावर -
विशेष म्हणजे संजय राऊत यांच्या वृत्तानंतर पाठोपाठ क्रांती रेडकर-वानखेडे आणि जास्मिन वानखेडे या दोघी देखील राज्यपालांना भेटायला पोहोचल्या आहेत. संजय राऊत आणि वानखेडे कुटुंबीय यांनी राजभवनावर दिलेल्या भेटींनी अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट