मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि भाजपकडून सुरू असलेल्या कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना टार्गेट केले. (Sanjay Raut tweet On Kirit Somaiya) आज ट्विटरच्या माध्यमातून बाप बेटे जेलमध्ये जाणारच, कोठडीचे सॅनिटाइझर केले जात असल्याचे ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाईची मागणी केली
पीएमसी बँकेच्या राकेश वाधवान याच्या खात्यातून भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. याच पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची किरीट सोमय्यांचे संबंध असून त्यांनी वसईतील गोखीवरे भागात कोट्यवधींची जमीन कवडीमोल दरात खरेदी केल्याचा आरोप केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाईची मागणी केली आहे. (Sanjay Raut's allegations against Kirit Somaiya) आज संजय राऊत यांनी बाप बेटे आत मध्ये जाणार. वेट अँड वॉच, कोठडीचे सॅनिटाइझर सुरू आहे.. असे ट्विट करत सोमय्यांना सूचक इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या वरती अप्रत्यक्षपणे निशाना
महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर आणि राऊत यांच्या नातेवाईक, कुटुंबावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाईचा सातत्याने दाखवला जाणारा धाक या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार असे सांगून उत्सुकता वाढवली होती. मात्र केंद्रीय तपास यंत्रणाना आव्हान देत, भाजप नेते किरीट सोमय्या, त्याचा मुलगा निल सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस आणली. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या वरती अप्रत्यक्षपणे निशाना साधला होता. तसेच येत्या काही दिवसात साडेतीन नेत्यांची नावे कळतील, असे सूचित केले.
दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात, आता तुम्ही जा
मी तुम्हाला काय सांगितलं, भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन, जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा असही राऊत यावेळी म्हणाले आहेत. बाप बेटे नक्की जेलमध्ये जाणार असा दावाही त्यांनी केला आहे.
दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात, आता तुम्ही जा असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - Kirit Somaiya Vs Sanjay Raut : घरं अस्तित्वात नाहीत तर मग कर कशाचा भरताय? -किरीट सोमैया