मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. राऊत यांच्या मुलीचा लग्न सोहळा 29 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्त राऊत यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. जोरदार तयारी राऊत यांच्या निवासस्थानी सुरू आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी (Purvashi Sanjay Raut) हिची मल्हार नार्वेकर (Malhar Narvekar) यांच्याशी लग्नगाठ बांधली जाणार आहे. काही दिवसापूर्वी यांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता.
या शुभ सोहळ्याची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील रेनिसंस हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमाने होणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी रेनिसंस येथे लग्न समारंभ होईल. तर 1 डिसेंबर रोजी ग्रॅंड हयात येथे स्वागत सोहळा ठेवण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या प्रमाणे राजेश नार्वेकर देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.