मुंबई - विधानपरिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून न्यायालयाने राज्यपालांना फटकारल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाइलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, ती फाइल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का? अशी सडेतोड प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
'महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणार' -
राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राज भवनला आम्ही पेढे वाटू आता फाइल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही, आणि भूतं असली तर आसपास त्यांच्या असावी. उच्च न्यायालयाने प्रश्न विचारलाय, फाइलवर अद्याप निर्णय का होत नाही. ती फाइल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने १२ सदस्यांची नाव दिलेली आहे, त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणार आहे. त्यांनी त्यांच्या कामात गतीमानता वाढवावी, तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील असा सल्ला संजय राऊत यांनी राज्यपालांचा दिला आहे.
टूलकिट प्रकरण भाजपावरच उलटले -
टूलकिटचे प्रकरणात देशात चर्चा सुरू आहे. मात्र, सगळ्या समाजमाध्यमानवर भाजप ने विरोधासाठी त्याचा वापर केला आहे. प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर रेड टाका, याला पकडा त्याला पकडा असे सगळे सुरू आहे.
सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त करावे -
सरसंघचालक मोहन भागवत आदरणीय आहेत, परखडपण त्यांनी मत व्यक्त करावे अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला या देशात आजही महत्त्व दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहून आले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिरा इतकाच महत्त्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्ष जनतेला होती. आजही सरसंघचालकांना आवाहन करतो त्यांनी आपले मत व्यक्त करावे.