ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2022 : 'भाजप वीस मते कुठून आणणार?, चोऱ्या माऱ्या...'; संजय राऊतांचे टीकास्त्र - संजय राऊतांची भाजपावर टीका

विधानपरिषदेला ( Vidhan Parishad Election 2022 ) पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपाला 20 मतांची आवश्यकता आहे. ती मते कुठून आणणार. चोऱ्या माऱ्या, दबाव दहशत टाकून मते मिळवणार ना, अशी टीका राऊत यांनी भाजपावर केली ( Sanjay Raut Criticized Bjp ) आहे.

sanjay raut
sanjay raut
author img

By

Published : Jun 19, 2022, 12:43 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. भाजपाने पाच उमेदवार दिले असून, पाचवी जागा जिंकण्यासाठी वीस मतांची आवश्यकता आहे. ही मते कुठून आणणार, चोऱ्या माऱ्या, दबाव आणि दशहत टाकून मते मिळवणार ना. तसेच, लोकशाहीत खुलेआम दबाव आणि दशहत माजवली जात आहे. त्यामुळे स्वपक्षांच्या आमदारांना हॉटेल्समध्ये ट्रेनिंग द्यावी लागत असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला ( Sanjay Raut Criticized Bjp ) आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात हॉटेल राजकारणाला जबाबदार कोण, मत प्रक्रिया समजून सांगण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. पूर्वी सर्वांना एकत्र आणले जात नव्हते, परंतु सध्या होत आहे. महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष आहे. ज्यांच्याकडे केवळ दोन संख्याबळ जास्त आहे. त्यांना पाचवी जागा जिंकण्यासाठी वीस मतांची आवश्यकता आहे. ही मते कुठून आणणार. चोऱ्या माऱ्या, दबाव आणि दशहत टाकून मते मिळवणार ना. लोकशाहीत हे प्रकार पूर्वी छुप्या पध्दतीने करत होते. आता थेट उघडपणे सुरु केले आहेत. भाजपाच्या अशा वृत्तीमुळे आमदारांना हॉटेल्समध्ये ट्रेनिंग दिली जाते. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाने मतभेदाच्या अफवा पसरवल्या आहेत. परंतु, तिन्ही पक्षात समन्वय आहे. त्यांनी कितीही अफवा परसवल्या तरी त्यांना फळ मिळणार नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.

'मतदानाचा अधिकार का नाकारला?' - देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकारा नाकारण्यात आला. त्यावर बोलताना राऊतांनी म्हटलं, खुन करणाऱ्या कैद्याला देखील मतदानाचा अधिकार आहे. मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना का मतदानाचा अधिकार नाही?. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. या दोन्ही सदस्यांना कोणत्या न्यायाने मतदानाचा अधिकार नाकारला याविषयी संभ्रम आहे. महाविकास आघाडीची दोन मते कमी करण्यासाठी पडद्यामागून खेळ सुरु असून, दबावाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला. तसेच, देशाचे स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था धोक्यात आल्याचे राऊत म्हणाले.

'हिंदूंच्या न्याय आणि हक्कांसाठी शिवसेना लढत आहे' - बाळासाहेबांनी कुंचला, लेखणी आणि वाणी या शस्त्रांचा वापर करत मराठी माणूस, महाराष्ट्रातील अन्यायाला वाचा फोडली. आंदोलने उभी केली. देशभरातील भूमिपुत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडली. यात लक्ष घातले नाही तर देशात वनवा पेटू शकतो, हे लक्षात घेत सरकारने दखल घेतली. बाळासाहेबांवर आधी परप्रांतीयवादी, असा शिक्का मारला गेला. तीन महिने पक्ष चालणार नाही, अशी टीका झाली. आज संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांचे राजकारण सुरु आहे. बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली. त्यातून देशभर प्रादेशिक पक्ष तयार झाले. एक प्रादेशिक पक्ष काय करु शकतो, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे. सध्या देशाचे राजकारण हे प्रादेशिक पक्षांच्या जीवावर सुरु आहे, याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनी द्यायला हवे. प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचे राजकारण उभे आहे. शिवसेना देशाच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

'अबतक छप्पन, आगे भी जायेंगे' - महाराष्ट्रात मराठी माणसांचे, देशात हिंदूचे न्याय, हक्क यासाठी शिवसेना लढत आहे. ज्या प्रकारचे वातावरण आज देशात आणि महाराष्ट्रात झाले आहे, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. अबतक छप्पन आगे भी जायेंगे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट करताना, उद्धव ठाकरे आमदार, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेले भाषण देशाला दिशादायक ठरते, असे सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022 : फडणवीसांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना; ऐनवेळी ठरवणार कोटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.