ETV Bharat / city

Sanjay Raut on BJP over Terrorism : केंद्रातले सरकार काश्मिरी जनतेचे, जवानांचे रक्षण करू शकत नाही - संजय राऊत - काश्मिरी पंडीत अत्याचार संजय राऊत प्रतिक्रिया

काश्मीरमध्ये देशाचे जवान ( Sanjay Raut on BJP over Terrorism ) हुतात्मा होत आहेत. नागरिकांवर हल्ले ( Terrorism in Kashmir ) होत आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रातले सरकार काश्मिरी जनतेचे, देशातील जनतेचे, जवानांचे रक्षण करू शकत नाही, असा थेट आरोप केला संजय राऊत ( Sanjay Raut on Kashmiri pandit in Kashmir ) यांनी केला आहे.

sanjay raut comment on bjp over terrorism
संजय राऊत प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 2, 2022, 11:52 AM IST

मुंबई - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आतंकवाद्यांनी ( Terrorism in Kashmir ) डोके वर काढले आहे. आतंकवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये रोज चकमकी होत आहेत. यात आपल्या देशाचे ( Sanjay Raut on BJP over Terrorism ) जवान हुतात्मा होत असल्याने सध्या हा कळीचा मुद्दा बनला आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, केंद्रातले सरकार काश्मिरी जनतेचे, देशातील जनतेचे, जवानांचे रक्षण करू शकत नाही, असा थेट आरोप ( Sanjay Raut on Kashmiri pandit in Kashmir ) केला आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा - अश्लील संदेश विरोधात भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची पोलिसांकडे तक्रार

सरकार अपयशी - राऊत म्हणाले की, 370 कलमचा विषय नाही किंवा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून देखील काही फरक पडलेला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याच्या संदर्भात त्यांनी सरकारला सूचना केली आहे. केंद्रातले सरकार ( BJP ) हे प्रखर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. काश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे खतम होईल, असे सांगणारे सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचे जवानांचे, आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी जे या देशाची सेवा करताना शहीद होत आहेत, त्यांचे रक्षण करू शकत नाही.

गृहमंत्र्यांना वेळ नाही - देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे केवळ निवडणुका आणि राजकारण याच्यामध्ये गुंतून पडले आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे काश्मीरमधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. पण, दुर्दैवाने फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर, याच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, याचे दुर्दैव आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

भाजपच्या गळाला मासा - हार्दिक पटेलच्या भाजप प्रवेशावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपवाल्यांनी आपल्या स्वतःच्या भूमिका पडताळून पाहायला हव्यात. याच लोकांनी देशद्रोही या शब्दाची व्याख्या हार्दिक विषयी केली होती. भारतीय जनता पक्षाने, ती काय होती, अर्थात असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर यांच्यामार्फत दबाव आणले जातात. हार्दिक पटेल सुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले.

हेही वाचा - अविनाश भोसले यांना ईडीची नोटीस, जप्त केलेली मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.