मुंबई - गोव्याच्या जनतेचा जनाधार भारतीय जनता पक्षाच्या मागे असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस हे गोव्यामध्ये गेल्यानंतरच भारतीय जनता पक्ष फुटला. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री मायकल लोगो यांनी राजीनामा दिला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने देखील पक्ष सोडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत जे युद्ध सुरू आहे. त्या विरोधात लढाई करावी अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut criticized devendra fadnavis ) यांनी केली आहे. मुंबई आज ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे ( Sanjay Raut press conference ) वक्तव्य केले.
उत्तर प्रदेशला भेट देणार -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50-100 जागा लढवणार आहे. मी उद्या पश्चिम उत्तर प्रदेशला भेट देणार आहे असे संजय राऊत यांनी ( sanjay raut visiting western Uttar Pradesh ) सांगितले आहे.
-
Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh Assembly elections. I will be visiting western Uttar Pradesh tomorrow: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/ycwLXT0yrl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh Assembly elections. I will be visiting western Uttar Pradesh tomorrow: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/ycwLXT0yrl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 12, 2022Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh Assembly elections. I will be visiting western Uttar Pradesh tomorrow: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/ycwLXT0yrl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 12, 2022
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाई नोटांशी -
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाईही नोटांशीचं आहे, निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गोव्यामध्ये नोटांनी भरलेल्या बॅगा पाठवल्या जात आहेत. त्या भरलेल्या नोटांच्या बॅगाशी शिवसेना लढणार असून गोव्याच्या जनतेने नोटांच्या दबावाखाली येऊ नये असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
सत्तेत येणाऱ्या पक्षाला गळती लागत नाही -
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर येईल असे ओपिनियन पोल दाखवले जात आहेत. मात्र सत्तेत येणाऱ्या पक्षाला कधीही गळती लागत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मंत्री आणि आमदार तसेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष सोडत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्तापरिवर्तन होईल याची खात्री असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले.
'आधी शरद पवारांएवढी उंची गाठा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात काम करण्यासाठी कधी येतील. तसेच शरद पवार पंतप्रधान कधी होतील अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र शरद पवारांच्या राजकीय आणि सामाजिक कामांएवढी उंची आधी गाठा. केवळ पंतप्रधान पदावर एखादी व्यक्ती बसली म्हणून त्यांची उंची मोठी होत नाही. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांची उंची मोठी होती. मात्र पंतप्रधान न झाल्यामुळे काही लोकांची उंची कमी होत नाही असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री आपलं काम व्यवस्थित करत आहेत. उद्या पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकीत देखील त्यांचा सहभाग असल्याची माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा - Nititn Gadkari Positive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण