मुंबई - सुपर मार्केट, किराणाच्या दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून ( wine selling in supermarket ) भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv sena leader Sanjay Raut ) यांचे वाईन उद्योगातील पार्टनरशिप असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा ( Sanjay Raut Attack on BJP ) साधला. लालच दाखवली, धमकी दिली तरी घाबरलो नाही. आता सेंट्रल एजन्सी मागे लावल्या आहेत. २०२४ पर्यंत असेच सुरू राहील, हम झुकेंगे नहीं, असा फ्लिमी स्टाईल सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे.
भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल -
महाराष्ट्रात किराणा दुकाने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने या निर्णयावरून महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा घाट असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबाने वाईन उद्योगातील मोठ्या व्यक्तीचे पार्टनरशिप केल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. या आरोपाला राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले.
संजय राऊतांचा पुष्पा स्टाईल भाजपला इशारा -
पहिल्यांदा ऑफर्स दिल्या, धमकी दिली, मात्र हार मानली नाही. त्यानंतर आता कुटुंबाला धमकी देण्यात येत आहे. तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आता तर थेट सेंट्रल एजन्सी आमच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवल्या आहेत. सगळं ठीक आहे, हे असाच 2024 पर्यंत सुरू राहील याची आम्हाला खात्री आहे. मात्र कितीही काहीही झालं तरी घाबरणार नाही, असा पुष्पा सिनेमा स्टाईल डायलॉगने भाजपला इशारा दिला आहे.
हेही वाचा - Anil Deshmukh On Anil Parab : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "अनिल परब पोलीस बदलीबाबत..."