ETV Bharat / city

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत ईडी चौकशीला गैरहजर; वेळ वाढवून मागितला

author img

By

Published : Jul 20, 2022, 7:47 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी आज पुन्हा ईडीने (ED) चौकशी करिता, मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं होते. मात्र लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनामुळे राऊत उपस्थित राहु शकले नाहीत. यासाठी त्यांनी आठ ऑगस्टपर्यंत ईडीकडे वेळ मागितला असण्याची माहिती मिळाली आहे. राऊत यांना गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा ईडीने आज चौकशी करिता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं होते. मात्र लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनामुळे राऊत उपस्थित राहिले नसून त्यांनी आठ ऑगस्टपर्यंत ईडीकडे वेळ मागितला असण्याची माहिती मिळाली आहे. राऊत यांना गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.

काय आहे पत्राचाळ घोटाळा? : मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या 'गुरु आशिष कन्स्ट्रक्शन' या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

संजय राऊतचे नाव समोर : ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.

प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ प्रकरण नेमक आहे काय? : ज्या प्रकरणात संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे. त्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन प्रकरण आहे. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची 2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात केली होती. याशिवाय प्रवीण राऊत यांची 9 कोटींची मालमत्ता त्यावेळी जप्त करण्यात आली होती. तर पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणाची चौकशी करणार्‍या ईडीला फेब्रुवारीमध्ये माहिती समजली होती की, प्रवीण राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून वर्षाला 55 लाख रुपये दिले होते. संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था आणि तिकिटे बुक करण्यात आली असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा : Maharashtra Breaking News : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.