ETV Bharat / city

समीर वानखेडेंची विभागीय चौकशी सुरू, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची होणार चौकशी-एनसीबी - NCB probe of Puja Dadalani

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी हे अधिकारी करणार आहेत.

डीडीजी ज्ञानेश्वर सिंह
डीडीजी ज्ञानेश्वर सिंह
author img

By

Published : Oct 27, 2021, 3:49 PM IST

Updated : Oct 27, 2021, 4:44 PM IST

मुंबई- किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. प्रतिज्ञापत्रातील आरोपाबाबत चौकशीसाठी एनसीबीकडून समिती नेमण्यात आल्याचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. तपासासाठी मुंबईत आल्याची माहिती तपास पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.

डीडीजी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, की मुंबईच्या कार्यालयातून काही कागदपत्रे आणि रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच साक्षीदारांनादेखील बोलावण्यात आले आहे. आम्ही प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुढे साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील. या चौकशीअंती जे निष्कर्ष निघतील, त्याची माहिती माध्यमांना देण्यात येईल असेही सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा-समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट

या प्रकरणातील सर्वांची चौकशी होणार

प्रकरणाशी संबंधीत जेवढे लोक असतील, त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. समीर वानखेडेंवर जे आरोप लावण्यात आले आहेत, त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली जाईल. त्यांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, सध्या समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविला जात असल्याचेही ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर एनसीबीने समिती नेमली आहे. ही समिती आरोपांची चौकशी करत आहे.

समीर वानखेडेंची विभागीय चौकशी सुरू
हेही वाचा-Drug Case : डीलशी माझा संबंध नाही, सत्य समोर आणणार - प्रभाकर साईल

मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी हे अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत, असे सांगण्यात आले आहेत.

हेही वाचा-Mumbai Drug Case : मुंबई पोलिसांनी पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला
कोण आहेत प्रभाकर साईल?

प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहेत. 30 जुलै 2021 रोजी ते गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेले होते. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचे गोसावीने त्यांना सांगितलं होते. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमले होते.

साईल यांचे काय आहेत आरोप?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केल आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू, त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे. केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगा दिल्या
प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले, की एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साईल यांनी सांगितले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखविण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

Last Updated : Oct 27, 2021, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.