ETV Bharat / city

एनसीबी पथकाकडून समीर वानखेडेंचा चार तास जवाब नोंदवला, मात्र तक्रारदार गायब

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने गौप्यस्फोट करत किरण गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर डील करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल याच्या २५ कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

sameer wankhedes statement
sameer wankhedes statement
author img

By

Published : Oct 28, 2021, 12:04 AM IST

Updated : Oct 28, 2021, 12:17 AM IST

मुंबई - क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने गौप्यस्फोट करत किरण गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर डील करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. प्रभाकर साईल याच्या २५ कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. परंतु, २५ कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर आपला जबाब नोंदवण्याची हजर व्हावे, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले, की आज आम्ही समीर वानखेडे (क्रूझवर ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे NCB अधिकारी) यांचे तब्बल 4 तास जवाब नोंदवले. त्यांनी अनेक तथ्य पथकासमोर ठेवले. गरज पडल्यास त्याच्याकडून आणखी पुरावे आणि कागदपत्रे मागवली जातील.

एनसीबी पथकाकडून समीर वानखेडेंचा चार तास जवाब नोंदवला

समीर वानखेडेंची चार तास चौकशी -

एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या चौकशीची माहिती दिली आहे. समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीचा जबाब नोंदवण्यासाठी एनसीबीने त्यांना नोटीस पाठवली होती. परंतु त्यांना ती नोटीस मिळाली नाही. यामुळे मीडियाच्या माध्यमातून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाकर साईल याने सोशल मीडियावर २५ कोटी खंडणी मागितल्याचे आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर माहिती द्यावी, असे आवाहन एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी केले आहे.

हे ही वाचा - राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, शर्लिन चोप्राचा आरोप

समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याबाबत चौकशी टीम निर्णय घेईल. प्रभाकर साईलने पत्राद्वारे सोशल मीडियावर आरोप केले होते. या आरोपांच्या आधारावर चौकशी टीम गठीत कऱण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली परंतु पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीची चौकशी होणे बाकी आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर साईलने चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर सिंह यांनी केले आहे.

Last Updated : Oct 28, 2021, 12:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.