ETV Bharat / city

समिर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही पदमुक्ततेची सूचना नाही; 2 वर्षांत केली 'ही' कामगिरी - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे टर्म

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( Sameer Wankhede ncb zonal director term ) यांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ संपला आहे. तरी समीर वानखेडे यांची पदमुक्ततेची सूचना आलेली नाही. त्यामुळे, पुन्हा तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. समीर वानखेडे यांनी दोन वर्षांत 330 आरोपींना अटक केली आहे तर, 1 हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले आहे.

Sameer Wankhede ncb zonal director term
Sameer Wankhede ncb zonal director term
author img

By

Published : Jan 1, 2022, 5:20 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( Sameer Wankhede ncb zonal director term ) यांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ संपला आहे. तरी समीर वानखेडे यांची पदमुक्ततेची सूचना आलेली नाही. त्यामुळे, पुन्हा तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. समीर वानखेडे यांनी दोन वर्षांत 330 आरोपींना अटक केली आहे तर, 1 हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले आहे.

हेही वाचा - Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्याने चर्चेत आले

समीर वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्याने ते चर्चेत आले. या प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

कोण आहेत समीर वानखेडे ?

2008 बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे हे निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी ज्ञानदेव वानखेडे यांचे पुत्र आहेत. मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून ते मुदतवाढ मागणार नसल्याचे निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले.

1 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले

समीर वानखेडे यांनी सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे 1 हजार 791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली. सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणी गृहमंत्री पदकने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये पोहोचले. प्रकरण स्वत:च्या हातात घेत त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून सुरुवात करून अनेक हाय - प्रोफाईल बॉलिवूड सेलिब्रिटींची एनसीबीने वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली आणि त्यांना अटक केली.

बनावट जात प्रमाणपत्र दाखविल्याचा आरोप

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकून कथितरित्या ड्रग्ज जप्त केले आणि आर्यन खानसह इतरांना अटक केली. पण नंतर, एनसीबीने छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांच्या ओळखपत्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले आणि अंमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी शाहरूख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यांनी आरोप केला की, हे अधिकारी जन्मत मुस्लीम आहेत. मात्र, नंतर त्यांनी अनुसूचित जाती कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे दाखवली.

समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 दरम्यान 28 केसेस रजिस्टर केल्या आणि 96 गुन्हेगारांना अटक केली. तर, 2021 मध्ये 17 डिसेंबर पर्यंत समीर वानखेडे यांनी 117 केसेस दाखल केले आणि 234 गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी तब्बल 1 हजार कोटी रुपयांची 1 हजार 791 किलो ड्रग्स जप्त केली. तर, 11 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे.

गेले काही महिने समीर वानखेडे यांच्या विरोधात वाद सुरू आहेत. त्यामुळे, या पदावर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर ड्रग सिंडीकेट विरुद्ध सुरू झालेल्या कारवाईत वानखेडे सामील होते. या सिंडीकेटमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सामील असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ऑक्टोबरमध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई किनाऱ्यावर एका क्रुझवर घातलेल्या धाडीत मादक पदार्थ मिळाले होते. त्यावेळी बॉलिवूड कलाकार शाहरूख यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते.

कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील आयआरएस ( IRS ) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये रूजू झाले होते. CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय, नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो, नॅशनल डिजास्टर रेस्पॉन्स फोर्स, नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी यांसारखे विविध विभाग येतात. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले. भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षे काम केले आहे.

कोणकोणत्या पदांवर काम

2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली

2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत.

हेही वाचा - Girl Commits Suicide: मालकिणीने लावला चोरीचा आरोप,17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.