मुंबई - नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मद्यविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी वयाची खोटी माहिती दिल्याबद्दल एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्यसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार ते आज कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले ( Sameer Wankhede Appear Kopari Police Station ) आहेत. यावेळी मी चौकशी ला सामोरे जात आहे. आहे ते संपल्यावर मी तुमच्याशी बोलेन, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर मद्यविक्रीचा परवाना घेण्यात आला होता. त्याची ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. त्यावेळी समीर वानखेडेंचे वय 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस होते. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला मद्यविक्रीचा परवाना दिला. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे सदगुरु बार आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारच्या मद्यविक्रीचा परवान्याचे नूतनीकरणही करण्यात आले आहे, असेही मलिक म्हणाले होते.
२८ फेब्रुवारीपर्यंत अटक नाही
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करणार न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत.
तातडीची सुनावणी नाही
समीर वानखेडे यांच्या ठाण्यातील एफआयआर रद्द करणारी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने ताशेरे ओढले. समीर वानखेडेंनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली? असा प्रश्न न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांनी कोर्ट स्टाफ आणि वानखेडेंच्या वकिलांना केला होता.
हेही वाचा - Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'