मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा दुसरा उमेदवार असलेले संजय पवार ( Sambhaji Raje Supporters slammed Shiv Sena with banners ) यांचा पराजय झाला. तर भाजपाचे धनंजय महाडिक जिंकले. या विजयानंतर भाजपकडून शिवसेनेवर टोमणे मारले जात असताना संभाजी राजे छत्रपती ( Sambhaji Raje) यांच्या समर्थकांनी ( Sambhaji Raje Supporters banners at Shiv Sena Bhavan ) थेट शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी केली आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध झाले महाराष्ट्र आमच्या बापाचा, शिवरायांचा गनिमीकावा वापरून छत्रपतींचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे जाहीर आभार, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. तसेच राज्यसभा तो एक झांकी हे, स्वराज्य मे 2024 मध्ये बाकी है, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा - TODAYS VEGETABLES PRICES : भाज्या पुन्हा कडाडल्या.. टोमॅटो, लिंबू, वाटाण्यासह शेपू, मुळ्याचा भाव वाढला
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेकडून अपक्ष उमेदवारी मागितली होती. छत्रपती संभाजीराजे ( Sambhaji Raje Supporters banners ) यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यामुळे संभाजीराजे हे शिवसेनेचे अधिकृत राज्यसभेचे उमेदवार होतील अशी प्रमुख अट शिवसेनेकडून घालण्यात आली होती. मात्र, ही अट संभाजीराजे यांनी अमान्य केल्यानंतर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर अपक्ष आमदारांकडून गद्दारी झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव - राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल ( Maharashtra Rajya Sabha Election 2022 ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपला उमेदवार जिंकणारच असा दावा केला होता. त्यादृष्टीने त्यांनी व्युहरचनाही केली होती. मात्र, निकालानंतर त्यांचे गणित फसल्याचे दिसून आले. संजय पवार यांचा पराभव झाला, तर धनंजय महाडिक निवडून आले.