ETV Bharat / city

Rajya Sabha election and Sambhaji Raje : राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याच्या शक्यतेने संभाजीराजे अडचणीत? - राज्य सभा निवडणूक संभाजी राजे बातमी

राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस ( Rajya Sabha election and Sambhaji Raje ) आणखी वाढली आहे. भाजपकडून आता संख्याबळ नसताना तिसरी जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी भाजपकडून पीयूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. भाजपने हा निर्णय घेतल्यास शिवसेने पाठोपाठ आता भाजपही संभाजीराजे ( Rajya Sabha election Sambhaji Raje news ) यांची वाट आणखी बिकट करणार आहे.

Rajya Sabha election Sambhaji Raje news
संभाजी राजे
author img

By

Published : May 18, 2022, 11:29 AM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस ( Rajya Sabha election and Sambhaji Raje ) आणखी वाढली आहे. भाजपकडून आता संख्याबळ नसताना तिसरी जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी भाजपकडून पीयूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. भाजपने हा निर्णय घेतल्यास शिवसेने पाठोपाठ आता भाजपही संभाजीराजे ( Rajya Sabha election Sambhaji Raje news ) यांची वाट आणखी बिकट करणार आहे. कारण राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे ( Rajya Sabha election Sambhaji Raje position ) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा - भाजप आमदार जयकुमार गोरेंवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाचा आज निर्णय अपेक्षित

भाजपकडून पीयूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी ( Sambhaji Raje for Rajya Sabha news ) भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार असे एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त २० मतांची गरज आहे.

शिवसेना लढणार चौथी जागा? - तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. महाविकास आघाडी घटक पक्षांकडे २६ अतिरिक्त मते असून आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरता १६ मतांची आवश्यकता असणार आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीचे हे गणित जमू शकते. म्हणून शिवसेनेने दुसरा उमेदवार उतरवण्याचा घाट केला आहे. तसा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्यातच जर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर संभाजी राजे ( Sambhaji Raje election news ) यांना उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. तर आता दुसरीकडे भाजपने तिसरी जागा लढवण्याची खेळी केली असल्याने निवडणूक लढवणाऱ्या संभाजी राजे यांची आता कोंडी झाली आहे.

संभाजीराजे यांचे सर्व आमदारांना पत्र - दरम्यान, शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसही पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेने दोन जागेवर उमेदवार उतरवण्याची तयारी केली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे मदतीचे आवाहन संभाजीराजे यांनी या पत्रात केले आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेशमध्ये सर्वांचे स्वागत.. राज ठाकरेंच्या दौऱ्यावर खासदार मनोज तिवारींची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.