मुंबई - दहशतवाद विरोधी पथक (ATS)कडे असणारा मनुसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या बद्दलची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एनआयए सध्या अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर मिळालेल्या स्फोटकांचा तपास करतंय तर हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे.
हे ही वाचा - कोरोनावरील उपचारात कोरोनील वापरता येणार नाही- आयएमए
मनसुख हिरेन आणि अंटालिया स्फोटक प्रकरण या दोघांचा तपास एकमेकांशी संबंधित आहे. यामुळे या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयए करणार असल्याचे देखील समजतंय. स्फोटक प्रकरणाचा तपास आधी वाझेंकडे होता. अधिवेशना दरम्यान विरोधकांनी मुद्दा उचलून धरला. दरम्यान याच काळात या प्रकरणाचा महत्त्वाचा व्यक्ती आणि स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा संशयितरित्या मृतदेह आढळला. दरम्यान विरोधी पक्ष आक्रमकतेने मुद्दा मांडत होते. सरकार बॅकफूटला गेले व सरकारला वाझेंची बदली करावी लागली. वाझेंना एनआयएनं चौकशीनंतर अटक केली. जर हिरेन मृत्यू प्रकरण जर एनआयएकडे गेले तर वाझेंच्या अडचणी वाढणार हे निश्चित.
हे ही वाचा - गौताळा अभयारण्यात तब्बल 8 दशकानंतर पट्टेरी वाघाचे दर्शन