ETV Bharat / city

Waze At Chandiwal Commission : मी या प्रकरणात फक्त एक प्यादा; वाझेची चांदिवाल आयोगासमोर माहिती - माजी गृहमंत्री अनिल देशमुख

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला(Dismissed Mumbai Police officer Sachin Waze) आज जवाब नोंदवण्यासाठी चांदिवाल आयोगासमोर(Chandiwal committee) हजर करण्यात आले होते. त्यावेळी वाझेने अनेक धक्कादायक माहिती आयोगाला दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख(ex-Maharashtra HM Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता.

sachin waze
सचिन वाझे
author img

By

Published : Nov 22, 2021, 3:06 PM IST

मुंबई - अँटेलिया स्फोटकं(Antilia bomb scare) आणि मनसुख हिरेन हत्या(Mansukh Hiren Murder) प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे(Dismissed Mumbai Police officer Sachin Waze) सध्या अटकेत आहे. आज त्याला चांदिवाल आयोग(Chandiwal committee) समितीसमोर चौकशीसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी वाझेने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मी या प्रकरणातील फक्त एक प्यादा आहे, असे चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे याने म्हटले आहे.

  • सचिन वाझे चांदिवाल आयोगासमोर हजर -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख(ex-Maharashtra HM Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. देशमुख खंडणी वसूल करण्यासाठी वाझेचा वापर करत होते, असा आरोपही करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेची चौकशी सुरू आहे. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात सध्या सचिन वाझे हा तुरुंगात आहे. आज त्याला चांदिवाल आयोगासमोर शंभर कोटी वसुली प्रकरणात जवाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने आयोगासमोर आपले मत व्यक्त केले आहे. यापुढील सुनावणीत आयोग आता उलट तपासणी करणार आहे.

  • काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंह यांनाही पोलीस आयुक्त पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंह यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंह यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली होती.

  • परमबीर सिंह यांनी केलेले आरोप -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेला त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेला म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात, तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केले होते. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.