ETV Bharat / city

उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना, महाविकास आघाडी सरकारला उपदेश करू नये - सचिन सावंत

उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना असून महाविकास आघाडी सरकारला उपदेश करू नये, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला खडसावले आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सावंत यांनी भाजपला ट्विटरवरुन प्रतिउत्तर दिले आहे.

Sachin Sawant's criticism of BJP
उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना! महाविकास आघाडी सरकारला उपदेश करु नये; सचिन सावंत खडसावले
author img

By

Published : May 7, 2021, 5:49 PM IST

मुंबई - गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडी कोरोना विरोधात लढा देत आहे. महाविकास आघाडीला करोनाबाबत भाजपकडून उपदेशाची आवश्यकता नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला खडसावले. आम्ही करोनाच्या संकटात कार्यक्षमतेने काम करत आहोत. करोना हाताळण्यापेक्षा निवडणुकीत मग्न राहणाऱ्या आणि जनतेला मदत करण्याऐवजी सेंट्रल व्हिस्टात स्वतःसाठी अलिशान महाल उभारणाऱ्या मोदीजींना या उपदेशाची गरज असल्याचा टोला भाजपला लगावला.

Sachin Sawant's criticism of BJP
उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना! महाविकास आघाडी सरकारला उपदेश करु नये; सचिन सावंतांनी खडसावले

'राज्याचा खर्च वाढतोय'

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर चौफेर टीका सुरु आहे. आता नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवास पुनर्विकासावरुन भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) यासाठी मंगळवारी ९०० कोटी रुपयांची निविदा मागवली. सत्ताधारी पक्षावर राज्याचा खर्च वाढत असल्याचा आरोप भाजपने केला. कॉंग्रेस प्रवक्ते सावंत यांनी भाजपला ट्विटरवरुन प्रतिउत्तर दिले.

'फडणवीस सरकारमुळेच खर्च वाढला'शहेनशहा मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपाने बेफाम आरोप केला आहे. मनोरा दुरुस्त करता आला असता. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात त्यातही घोटाळा झाला. म्हणून शहेनशहाला वाचवण्यासाठी व भाजपा आमदारांना दरमहा मिळणाऱ्या पैशांसाठी आरोप करु नका, असे सावंत यांनी बजावले. फडणवीस सरकारनेच मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय २०१८ ला घेतला. त्यांच्याद्वारे नेमलेल्या एनबीसीसी या एजन्सीने आधीची वास्तू जमीनदोस्त केली. बांधकामाला विलंब झाल्यामुळे सरकारचे ७०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दरमहा सुमारे ३.५ कोटी आमदारांना दिले जातात, असा गंभीर आरोप देखील सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जुंपणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.