ETV Bharat / city

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला भाजपचा आर्थिक हितसंबंधातून विरोध - सचिन सावंत - Kanjurmarg Metro Carshed Latest News

भाजपचा कांजूरमार्ग येथे प्रस्तावित असलेल्या मेट्रो कारशेडला विरोध आहे. यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच यामागे भाजपचे आर्थिक हितसंबंध लपले असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

Sachin Sawant criticizes BJP
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला भाजपचा आर्थिक हितसंबंधातून विरोध
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:52 PM IST

Updated : Dec 22, 2020, 8:20 PM IST

मुंबई - फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड करता निर्धारीत असलेल्या जमिनीवर, ११ जून २०१९ रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या महत्त्वकांक्षी योजनेसाठी एक लाख परवडणाऱ्या घरांचा प्रस्ताव स्वीकारला होता. शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने हा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला होता. हा प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. या जमिनीवर गरोडीया या बिल्डरचा संबंध प्रश्नांकित असल्याने शापूरजी पालनजी यांच्याबरोबर गरोडीयाने केलेला करार उच्च न्यायालयाने २०१६ साली रद्दबादल ठरवला होता. त्यामुळे सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचारही न करता फडणवीस सरकारने सदर प्रस्ताव कसा स्वीकारला असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

यावरून सांवत यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. गरोडीया यांच्याबद्दल भाजपला एवढा पुळका का आला, यातून भाजप सरकार काय साध्य करणार होते. भारतीय जनता पक्षाचे नेते बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का? असे अनेक प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत. मेट्रो-३ कारशेडच्या संदर्भात कांजूरचा आग्रह सोडा असा शाहजोगपणाचा सल्ला फडणवीस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला देत आहेत. मात्र ते शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने तेव्हाच्या शासनाला दिलेला प्रस्तावावर का बोलत नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

कांजूरमार्गच्या जागेचा भाडेकरार केंद्रीय मिठागर विभागाकडून रद्द

यासंदर्भात सचिन सांवत म्हणाले की, कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे असा निकाल तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहेच. परंतु सदर जमिनीवर केंद्रीय मिठागर विभाग व गरोडिया नावाच्या बिल्डर यांच्यात भाडे करारासंदर्भात न्यायालयात विवाद सुरु आहे. सदर जमीन ही मिठागर विभागाने १९१७ साली ९९ वर्षांच्या करारावर नानभाय भिवंडीवाला यांना दिली होती, ज्याचा करार १६ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. सदर भाडेकरुशी गरोडीयाचा संबंध नाही, असे मिठागर विभागाचे मत आहे. त्याचबरोबर या जमिनीवर मिठाचे उत्पादन होत नाही या कारणाने २ नोव्हेंबर २००४ रोजी केंद्रीय मिठागर विभागाने हा भाडेकरार रद्द केला होता.त्याला गरोडिया यांनी कोर्टात आव्हान दिले असता कोर्टाने भाडेकरार रद्द करण्यास स्थगिती दिली होती.

शापूरजी पालनजी कंपनीचा प्रस्ताव फडणवीसांनी कसा स्वीकारला?

असे असतानाही २००९ च्या दरम्यान गरोडियाने शापूरजी पालनजी कंपनीबरोबर करार केला व यामध्ये गरोडिया यांना शापूरजी पालनजी कंपनीकडून जवळपास ५०० कोटी रुपये मिळणार होते. शापूरजी पालनजी आणि गरोडीया यांच्यातील हा समझोता करार मुंबई नगर व दिवाणी न्यायालयाने १६ एप्रिल २०१६ रोजी रद्द केलेला आहे. तसेच ९९ वर्षांचा भाडेकरार हा २०१६ रोजीच संपुष्टात आलेला आहे. असे असतानाही ११ जून २०१९ रोजी शापूरजी पालनजी कंपनीचा या जमिनीशी कोणताही संबध नसताना त्यांच्याकडून एक लाख घरांचा आलेला प्रस्ताव फडणवीस सरकारने का स्विकारला? हे बेकायदेशीर कृत्य नव्हते का याचे उत्तर द्यावे. ज्या गरोडीयाचा भाडेकरार रद्द झालेला आहे त्याच्या नावाने भाजपा गळे काढत आहेत. यात भाजपाचे कोणते व्यावसायीक संबंध होते याचे उत्तरही द्यावे. अशी टीका सावंत यांनी केली आहे.

कांजूरमार्ग मिठागराची जागा फडणवीसांना गृहनिर्माण प्रकल्पासाठी मान्य

कांजूरमार्गची मिठागराची जमीन ही गृहनिर्माण प्रकल्पासाठी फडणवीस यांना मान्य होती, पण मेट्रो कारशेडसाठी त्यांचा नकार होता हे कसे शक्य आहे. याच व्यावसायिक हितसंबंधापोटी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारकडे मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूर येथील जागेचा आग्रह सोडा अशी भूमिका घेत आहेत. परंतु मेट्रो- ६ चा कारडेपो कांजूरमार्गच्या त्याच जागेवर फडणवीस सरकारने निर्धारित केला होता. मेट्रो ६ च्या डीपीआरमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सदर मेट्रो ६ चे काम २०१७-१८ पासून सुरुही झालेले आहे. असे असताना सदर मेट्रो ६ चा डीपीआर फडणवीस सरकारने बदलला नाही किंवा दुसऱ्या जागेचा शोध घेण्याची प्रक्रियाही केली नाही.

मोदींच्या इच्छेखातर मुंबईकरांना भाजप वेठीस धरत आहे

परंतु मेट्रो ६ च्या कारडेपोकरिता एमएमआरडीएने फडणवीस सरकार असताना केंद्रीय मिठागर विभागाकडे २८ मार्च २०१९ ला जागा मागितली होती. तसेच या जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत देखील केंद्रीय मिठागर विभाग तसेच केंद्रीय वाणिज्य विभागाला देण्याची तयारी आहे अशी हमी दिली होती. जर एमएमआरडीए कांजूरच्या जागेसाठी पैसे देण्यास तयार होती, तर मेट्रो ३ चे पैसे वाचलेच असेत. याचाच अर्थ केवळ मेट्रो ३ च्याच कारशेड संदर्भात यांना कांजूरची जागा नको होती, मेट्रो ६ साठी चालणार होती. एक लाख परवडणाऱ्या घरांसाठी चालणार होती पण मेट्रो ३ च्या कारशेडसाठी चालणार नव्हती, या विरोधाभासाचे उत्तर भाजपाच्या आर्थिक हितसंबंधामध्येच आहे, असे सावंत म्हणाले. या आर्थिक हितसंबंधांतून व मोदींच्या इच्छेखातर मुंबईकरांना भाजप वेठीस धरत असल्याचा आरोपी त्यांनी केला आहे.

राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची भेट घेण्याचा सल्ला देतात

मेट्रो २ च्या चारकोप डेपोकरिता आणि पुणे मेट्रोकरिता तिथल्या कारडेपोसाठीच्या जमिनींवर विवाद असतानाही न्यायालयाने मेट्रोचे काम सुरु ठेवण्यास सांगितले आहे. याची भाजपा नेत्यांनी माहिती घ्यावी असेही सावंत यावेळी म्हणाले.
राज्याच्या भाजपा नेत्यांमुळेच जुलै महिन्यामध्ये राज्याला केंद्रीय मिठागर विभाग ही जागा देण्याची तयारी दर्शवत असताना सप्टेंबरमध्ये प्रकल्प थांबवा अशी भूमिका केंद्रीय मिठागर विभागाने घेतली. आज भाजपाचे नेते मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पंतप्रधानांना भेटा असा सल्ला देत आहेत. त्या भाजपा नेत्यांचे मुंबईकरांशी काही दायित्व आहे की नाही, असा सवाल सावंत यांनी विचारला आहे.

Last Updated : Dec 22, 2020, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.