मुंबई - केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे ज्या प्रत्येक राज्यात राज्यपालांचा उपयोग हा भारतीय जनता पक्षाचे राजकारण आणि सत्ता करण्यासाठी केला जातो आहे. अनेक राज्यांमध्ये हे राज्यपालांनी जे निर्णय घेतलेले आहेत, ते त्या राज्यातील विरोधी पक्षांसाठी अन्यायकारक आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
महाराष्ट्रमध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे संविधानिक प्रक्रियेत बघायला गेले तर विरोधी पक्षाचे मत जाणून न घेताच राज्यपालांनी विरोधी पक्षांचे एकत्रित सरकार बनुच नये, ही भावना होती. यामुळे राष्ट्रपती राजवटीसाठी प्रस्ताव पाठवला आणि केंद्रातून हा निर्णय घेतला गेला. राज्यपाल हे एक संविधानिक जबाबदारी आहे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. हे जे घडतंय त्याबद्दल काय बोलणार, असे मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.