ETV Bharat / city

मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत ! - शिवसेना

उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र अशा राज्यांतला मजूरवर्ग देशात पसरलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत तो सर्वाधिक आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्‍यांची ‘व्होट बँक’ बनली होती व जणू मुंबई-महाराष्ट्र यांच्याच श्रमातून उभा राहिला अशी बतावणी सुरू होती.

सामना संपादकीय
सामना संपादकीय
author img

By

Published : May 6, 2020, 10:31 AM IST

मुंबई - महाराष्ट्रातील मजूरांबाबत तळमळ व्यक्त करणारे नेते, आता या मजूरांची जबाबदारी झटकत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर राज्यात परत येणाऱ्या मजूरांना प्रवेश नाकारला होता. आधी चाचणी मग प्रवेश असे धोरण त्यांनी लावून धरले. याबद्दल सामनातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 'उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’ घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही. आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात व उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्याने 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे.' असे सामना संपादकीयतून म्हटले आहे.

हेही वाचा... राज्यात दोन दिवसात ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्य विक्री

कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मजूरवर्ग अडकून पडला, त्यांना आपल्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी आता केंद्र सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेश-बिहारचे सर्वाधिक मजूर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत राहतात. हा आकडा 25-30 लाखांच्या घरात असावा व या लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. सुरत येथे तर उत्तर प्रदेशातील हजारो मजूर रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. मुंबईतही वेगळी परिस्थिती नाही, पण या लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे.

मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत...

'उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र अशा राज्यांतला मजूरवर्ग देशात पसरलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत तो सर्वाधिक आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्‍यांची ‘व्होट बँक’ बनली होती व जणू मुंबई-महाराष्ट्र यांच्याच श्रमातून उभा राहिला अशी बतावणी सुरू होती. आता या मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करीत आहेत व त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही' असे सामनात म्हटले आहे.

व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको...

'आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे. व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’ घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही' अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांना सामनातून फटकारले आहे.

योगी सरकारकडून गरीब श्रीमंत भेदभाव...

'योगी सरकारने राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणण्यास शेकडो बस पाठवल्या व त्यांना विनाचाचण्या आणण्यात आले. कारण ही श्रीमंतांची मुले होती, पण मजूरवर्गास मात्र कोणी वाली नाही. हा मजूरवर्ग आपल्या गृहराज्यात न आलेलाच बरा या भावनेतून अटी-शर्ती टाकल्या जात आहेत. श्रमिकांना आणायचे कसे? त्यांच्या रेल्वे, बसेसची तिकिटे काढायची कोणी? हा मोठा प्रश्न गाजू लागला. रेल्वे म्हणते, कोणाला फुकटात सोडणार नाही. बसवालेसुद्धा तेच सांगत आहेत व आपापल्या लोकांना परत आणण्यास राज्य सरकारे श्रमिकांचा भार वाहायला तयार नाहीत.' अस सांगत योगी सरकार गरीब श्रीमंत असा भेदभाव करत असल्याचे सामनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.