ETV Bharat / city

राज्यात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर कारवाई; २६१ रिक्षाचालकांचे परवाने निलंबन - License suspension

रिक्षा चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारने, जादा प्रवासी, जलद मीटर, उद्धट वर्णन यासंबंधित दररोज यासंबंधित राज्यभरातून परिवहन विभागाला तक्रारी येतात. त्यानुसार रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आरटीओने कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यभरात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकाराला आहे. मात्र, या कारवाईचा समर्थ न करता, ज्या पद्धतीने रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने भ्रष्टाचारी आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनावर कारवाई करण्यात यावीत. कारण जे रिक्षा चालक पैसे देत नाही. त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया भाजप टॅक्सी-रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 15, 2022, 10:52 PM IST

मुंबई - रिक्षा चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारने, जादा प्रवासी, जलद मीटर, उद्धट वर्णन यासंबंधित दररोज यासंबंधित राज्यभरातून परिवहन विभागाला तक्रारी येतात. त्यानुसार रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आरटीओने कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यभरात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकाराला आहे. मात्र, या कारवाईचा समर्थ न करता, ज्या पद्धतीने रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने भ्रष्टाचारी आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनावर कारवाई करण्यात यावीत. कारण जे रिक्षा चालक पैसे देत नाही. त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया भाजप टॅक्सी-रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

रिक्षा चालकांशी बातचित करताना प्रतिनिधी

एक कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड - मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली जाणारी रिक्षा, गणवेश परिधान न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणारे अशा अनेक प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील रिक्षा चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. परिवहन विभागाने (RTO) एप्रिल, २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत राज्यात तब्बल ४६ हजार ८८९ रिक्षाची तपासणी करण्यात आली असून त्यातील ९ हजार ५०२ रिक्षा चालक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड आकाराला आहे.

अशी आहे आकडेवारी - परिवहन विभागाने (RTO) एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीत राज्यात तब्बल ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर विविध कारणांसाठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये जादा भाडे आकाराने ४६३, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारे २ हजार ३२५, रिक्षाचे जलद मीटर ७९, प्रवासी भाडे नाकारणारे १९७, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणारे ८७ आणि इतर कारणासाठी ४ हजार ७३३, असे नऊ हजार ५०५ रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने कारवाई केली आहे. याशिवाय २६१ रिक्षाचालकांवर परवाना निलंबन तर ४०९ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आमचा कारवाईला विरोध नाही - परिवहन विभागाकडून राज्यात नऊ हजार रिक्षा चालकांनावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे मी समर्थन करतो. पण, सरकारला सांगू इच्छितो की, कारवाई त्याच रिक्षा चालकांकर होते जे आरटीओ अधिकाऱ्यांना पैसे देत नाही. सरकराने राज्यातील आरटीओ कार्यालयाची चौकशी करायला हवीत ज्यात बरेच आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट सापडतील. मात्र, स्वतःचा आरटीओ विभागाची चौकशी न करता रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. आज आरटीओ कार्यालयातून एक परवाना नुतनीकरण किंवा रिक्षा टॅक्सीचे पासिंग पैसे न देता होत नाही. त्यामुळे सरकारने आरटीओ कार्यालयाची चौकशी करावी भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनावर कारवाई करवीत, असे आरोप भाजप टॅक्सी- रिक्षा सेलचे अध्यक्ष के. के तिवारी म्हणाले. याबाबत आम्ही परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या फोन व्यस्त येत आहेत.

.... कारवाई चुकीची - राज्यभरात सुरू असलेल्या कारवाई अत्यंत्य चुकीची आहेत. अगोदरच कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षा टॅक्सी बंद असल्याने रिक्षा चालकांवर कर्जाचे ओझे झाले आहे. गेल्या वर्षीपासून रिक्षा चालकांचे व्यवसाय हळहळू रुळावर येत असताना दंड वाढविण्यात आले आहे. कधी पार्किंगमध्ये सुद्धा रिक्षा उभी असल्यास आम्हाला कारवाईचा सामना कारवा लागतो आहे. परिवहन आयुक्तांनी आरटीओ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया टॅक्सी चालक विनोद गुप्ता यांनी दिली आहे.

हेही वाचा - Pravin Darekar : विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्याचे विधानपरिषदेत पडसाद.. कामकाज तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.