मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तब्बल सात दिवस चौकशी केल्यानंतर या संदर्भात सीबीआय च्या पथकाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयच्या तपास पथकासमोर हजर होण्यासाठी रिया चक्रवर्ती घरातून रवाना झाली आहे. काही वेळापूर्वी सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा देखील सीबीआय चौकशी करत असलेल्या गेस्ट हाऊसला हजर झाला आहे.
सीबीआयच्या पथकाने गेली सात दिवस सुशांतचा कुक नीरज, तसेच त्याचा मित्र सिद्धार्थ पीठाणी आणि चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची चौकशी केली आहे. याचसोबत अकाउंटंट रजत मेवानी, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अन्य काही जणांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे.
-
Maharashtra: #RheaChakraborty leaves from her residence in Mumbai.#SushantSinghRajputDeathCase pic.twitter.com/jteP9iL1zC
— ANI (@ANI) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra: #RheaChakraborty leaves from her residence in Mumbai.#SushantSinghRajputDeathCase pic.twitter.com/jteP9iL1zC
— ANI (@ANI) August 28, 2020Maharashtra: #RheaChakraborty leaves from her residence in Mumbai.#SushantSinghRajputDeathCase pic.twitter.com/jteP9iL1zC
— ANI (@ANI) August 28, 2020
यानंतर संबंधित प्रकरणात रिया चक्रवर्तीला देखील समन्स देण्यात आले आहे. सीबीआयच्या तपास पथकासमोर हजर होण्यासाठी रिया चक्रवर्ती घरातून रवाना झाली आहे. गुरुवारी सीबीआयच्या पथकाकडून तब्बल चौदा तास रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची चौकशी करण्यात आली होती.
-
Maharashtra: Rhea Chakraborty's associate Samuel Miranda arrives at the DRDO guest house in Mumbai where the Central Bureau of Investigation team investigating #SushantSinghRajput's death case is staying. pic.twitter.com/7MybPPwPIu
— ANI (@ANI) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra: Rhea Chakraborty's associate Samuel Miranda arrives at the DRDO guest house in Mumbai where the Central Bureau of Investigation team investigating #SushantSinghRajput's death case is staying. pic.twitter.com/7MybPPwPIu
— ANI (@ANI) August 28, 2020Maharashtra: Rhea Chakraborty's associate Samuel Miranda arrives at the DRDO guest house in Mumbai where the Central Bureau of Investigation team investigating #SushantSinghRajput's death case is staying. pic.twitter.com/7MybPPwPIu
— ANI (@ANI) August 28, 2020
रामदास आठवले सुशांतच्या वडिलांच्या भेटीला
फरिदाबाद येथे वास्तव्यास असणाऱ्या सुशांतसिंहच्या वडिलांच्या भेटीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेले आहेत. यामुळे सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.