ETV Bharat / city

Restrictions in Mumbai : मुंबईतील पार्ट्यांवर महापालिकेची नजर, 'हे' आहेत नियम

मुंबईमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने पालिका अलर्ट झाली आहे. मोठ्या पार्ट्यांवर कठोर निर्बंध ( Restrictions in Mumbai On Xmas and new year celebration ) लागू असतील तसेच घरी होणाऱ्या पार्ट्यांवर पालिकेची नजर असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त ( BMC Commissioner ) इकबाल सिंह चहल यांनी दिली

author img

By

Published : Dec 18, 2021, 3:22 PM IST

इकबाल सिंह चहल
इकबाल सिंह चहल

मुंबई - मुंबईमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने पालिका अलर्ट झाली आहे. मोठ्या पार्ट्यांवर कठोर निर्बंध लागू ( Restrictions in Mumbai On Xmas and new year celebration ) असतील तसेच घरी होणाऱ्या पार्ट्यांवर पालिकेची नजर असेल, अशी माहिती पालिका आयुक्त ( BMC Commissioner ) इकबाल सिंह चहल यांनी दिली.

नियमांचे पालन करावे -

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असला तरी पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या 200 च्या पार गेली आहे. त्यातच आता ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे पालिकेने येणाऱ्या ख्रिसमस आणि 31 डिसेंबरवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्य सरकराने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करताना जारी केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताना कोणतेही कार्यक्रम करताना बंदिस्त जागा आणि बॅंकेट हॉल यामध्ये क्षमतेच्या 50 टक्के, तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीतजास्त 200 लोकांना परवानगी दिली आहे. या नियमांचे सर्वानी पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

पार्ट्यांवर लक्ष -

मोकळ्या जागेवर होणाऱ्या तसेच मोठ्या बंदिस्त जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांना गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने कठोर निर्बंध लागू असतील. घरी होणाऱ्या पार्ट्यांवरही पालिकेचे लक्ष असेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. ख्रिसमस आणि 31 डिसेंबर निमित्त होणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने प्रत्येककी विभाग कार्यालयात पथके नियुक्त केली आहेत. ही पथके पार्ट्यांच्या ठिकाणी जाऊन मास्क, नियमांचे पालन केले जाते आहे का तसेच उपस्थितीची तपासणी करणार आहेत.

हे ही वाचा - Ransom and Kidnapping Case : भाजपा नगरसेविकेचा मुलगा फरार घोषित , पोलिसांच्या भूमिकेवर संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.