ETV Bharat / city

महापालिका निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांचे फुटले पेव!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. राज्यात यंदा आतापर्यंत नव्या १५ पक्षांची नोंदणी झाली आहे. यामुळे राज्यात नोंदणीकृत पक्षांची संख्या आता २८४ वर पोहोचली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

author img

By

Published : Oct 15, 2021, 5:01 PM IST

महापालिका निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांचे फुटले पेव!
महापालिका निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांचे फुटले पेव!

मुंबई : पावसाळा आला की ज्याप्रमाणे अळिंबांची पैदास होते त्याप्रमाणे निवडणुका आल्या की नव्या राजकीय पक्षांचा उदय होतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ नव्या पक्षांनी यावर्षी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी ६ नव्या पक्षांनी नोंदणी केली आहे.त्यामुळे आतापर्यंत राज्यातील नोंदणीकृत पक्षांची संख्या वाढून २८४ इतकी झाली आहे. यातील १६ पक्ष हे पक्षचिन्ह मिळालेले मान्यताप्राप्त पक्ष आहेत. तर उर्वरित पक्ष अमान्यता प्राप्त आहेत.

कोरोना काळात कमी पक्षांची नोंदणी
गेल्या वर्षी राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने केवळ सहा राजकीय पक्षांनी नोंदणी साठी अर्ज दाखल केले होते. मात्र २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे १० महानगरपालिकांची मुदत संपते आहे. तर एप्रिलमध्ये ५ नगरपालिकांची मुदत संपुष्टात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या बहुतांश निवडणुका प्रस्तावित आहेत.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०२१ वर्षात आतापर्यंत १५ नव्या राजकीय पक्षांचा जन्म झाला आहे. निवडणुकांना अद्याप अवधी असल्याने येत्या तीन-चार महिन्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

विविध शहरात नव्या पक्षांची भर
नव्याने नोंदणी झालेल्या पक्षांमध्ये अकोला विकास योद्धा मंच, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टी, यवतमाळ. भुसावळ परिवर्तन लोकसेवा आघाडी, जळगाव. हिंदवी बहुजन सेवा, नांदेड. निफाड शहर विकास आघाडी, नाशिक. राष्ट्रीय जनमंच सेक्युलर, अहमदनगर. कृष्णा भीमा विकास आघाडी, सोलापूर. लोकशाही विकास आघाडी, सांगली. यासह अन्य काही राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. तर गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडी. हिंदुस्तान विकास पक्ष, पुणे. भारतीय ट्रायबल पार्टी, नाशिक. आमचं ठरलय विकास आघाडी, कोल्हापूर. मराठवाडा बहुजन विकास आघाडी, औरंगाबाद. वरणगाव शहर विकास आघाडी, जळगाव. सामान्य जनता पार्टी, ठाणे. जनता की पार्टी, गोंदिया यासह काही नव्या राजकीय पक्षांनी नोंदणी केली आहे.

वर्षनिहाय पक्षांची नोंदणी
वर्ष २०१६ --- ६६ पक्ष
वर्ष २०१७ -- ३९ पक्ष
वर्ष २०१८ -- १३ पक्ष
वर्ष २०१९ -- ०६ पक्ष
वर्ष २०२० -- ०६ पक्ष
आणि वर्ष २०२१ मध्ये आतापर्यंत १५ पक्षांची नोंद झाली आहे.
त्यामुळे येत्या काही महिन्यात आणखी पक्षांची या यादीत भर पडण्याची शक्यता असली तरी जनतेच्या पसंतीस कोणते पक्ष उतरतात आणि कोणाच्या पारड्यात किती मत पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचा - महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.