ETV Bharat / city

Eknath Shinde Left Hotel : एकनाथ शिंदे हॉटेलमधून पडले बाहेर, मुंबईच्या दिशेने नव्हे कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना - Shivsena Rebel MLAs

काँग्रेस- राष्ट्रवादीशी असलेली महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी ( Shivsena Rebel MLAs ) एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) नेतृत्वाखाली बंड पुकारले आहे.

एकनाथ शिंदे लाईव्ह अपडेट
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 24, 2022, 1:29 PM IST

Updated : Jun 24, 2022, 1:35 PM IST

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील हॉटेलमधून बाहेर ( Eknath Shinde coming to Mumbai ) पडले आहेत. आज ते राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता होत आहे. गुवाहटी तातडीने सोडा, आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शिंदेंना इशारा दिला होता. एकनाथ शिंदे हे कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना झाले आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादीशी असलेली महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी ( Shivsena Rebel MLAs ) एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) नेतृत्वाखाली बंड पुकारले आहे. या बंडखोर आमदारांची व्यवस्था गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ( Radison Blu Hotel Guwahati ) करण्यात आली आहे. या सर्व राजकीय नाट्ट्यात आमचा हात नसल्याचे भाजपचे नेते म्हणत असले तरी बंडखोरांना असलेला भाजपचा सपोर्ट काही लपून राहिलेला ( BJP Supports Shivsena Rebel MLAs ) नाही. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( assam cm himanta biswa sarma ) यांचे खासमखास असलेले पाच नेते याच हॉटेलमध्ये तळ ठोकून बंडखोरांची खातिरदारी करत आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात नव नवे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हणले आहे की, हम हार नही मांगेगे ... आता आमची वेळ आहे त्यांना आता आमचा सामना करावा लागेल, ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. सरकार राहीलेला अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणार असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी झाल्यानंतर आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रपोजपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.

यादी संशयास्पद झिरवाळ- मात्र ही यादी संशयास्पद असल्याचे सांगत नरहरी जिरवा यांनी भरत गोगावले यांच्या प्रकट नियुक्तीला मान्यता दिलेली नाही. या यादीत काही अपक्ष आमदार आहेत तर या यादीतील एक आमदार नितीन देशमुख यांनी आपली सही नाही असा दावा केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष येऊन हा दावा केल्यामुळे यादी वरच आता संशय निर्माण झाला आ.हे त्यामुळे ही यादी आपण मान्य करणार नाही, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी प्रत्यक्ष हजर रहावे किंवा कसे याबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाची मान्यता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, प्रस्ताव आला तर.. शिंदेंच्या बंडावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

हेही वाचा-Maharashtra Political Crisis: हम हार नही मांनेगे ... आता आमची वेळ, सरकार कार्यकाळ पुर्ण करणार - राऊत

Last Updated : Jun 24, 2022, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.