मुंबई - गेले बारा दिवस शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले अपक्ष आमदार तीन राज्यात फिरत होते. सुरत, गुवाहटी आणि त्यानंतर गोवा अशा तीन ठिकाणी त्यांचा मुक्काम झाला. शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) स्वतः या सर्व आमदारांना राज्यात आणण्यासाठी गोव्याला गेले आहेत. 12 व्या दिवशी या सर्व आमदारांना घेऊन गोव्यातील ताज हॉटेलमधून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा विमानतळापर्यंत बसने प्रवास केला. मुख्यमंत्र्यांची आपली सर्व सुरक्षा बाजूला ठेवून त्यांना साथ देणाऱ्या 50 आमदारांसोबत बस प्रवास करून गोवा विमानतळ गाठले. हा बंडखोर आमदारांचा गट सायंकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर व सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईतील ताज रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये असणार आहे.
शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही - 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून व्हिप जरी केल्याचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले आहे. मात्र, गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने जारी केलेला व्हीप आपल्या गटाला लागू होत नाही. आपल्या गटाकडे दोन तृतीअंशपेक्षा अधिक संख्याबळ असल्याने व्हीप आपल्या आमदारांना लागू होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Assembly Speaker Election 2022 : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी!