ETV Bharat / city

Reaction On Raj Thackeray Sabha : राज ठाकरे यांच्या भाषणानंतर विविध स्तरातून कारवाईची मागणी; वाचा कोण काय म्हणाले... - sanjay raut on raj thackeray

राज ठाकरे ( Raj Thackeray Sabha ) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जंगी सभा झाली. यावेळी त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा ( Raj Thackeray On Mosque Loudspeaker ) मुद्द्याचा पुर्नउच्चार केला. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावरही टिका केली. या सभेनंतर विविध नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर कारवाई करण्याची ( Raj Thackeray Speech ) मागणी केली आहे.

Raj Thackeray Sabha
राज ठाकरे
author img

By

Published : May 2, 2022, 4:05 PM IST

औरंगाबाद - मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray Sabha ) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जंगी सभा झाली. यावेळी त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा ( Raj Thackeray On Mosque Loudspeaker ) मुद्द्याचा पुर्नउच्चार केला. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जात नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावरही टिका केली. या सभेनंतर विविध नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे लेच्चा पेच्चांचे राज्य नाही! - राज ठाकरे यांच्या भाषणातील भोंग्याच्या मुद्द्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही विचारवंत आहोत. त्यामुळे, लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लढाई केली आहे. आंदोलने केली आहेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन करायला पाहिजे. हे लेच्या पेच्यांचे राज्य नाही आहे. इथे गृहमंत्री आहेत. सरकार आहे. सरकारला माहित आहे काय करायचे ( sanjay raut on raj thackeray ) आहे. सविस्तर वाचाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपकडून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी ( AAP demanded action on Raj Thackeray ) - राज ठाकरे यांनी भाषणात त्यांनी ४ मे नंतर भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदींपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू असा नवा अल्टिमेटम दिला आहे. यावर आम आदमी पक्षाकडून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी ही मागणी केली आहे. आव्हान नाही तर धमकी दिली? - राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षाने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक कार्यक्रम करण्याचे आव्हान नव्हते, तर ती धमकी होती. महाराष्ट्रातील शांतता अशा स्थितीत घेऊन जाण्याची धमकी होती ज्यामध्ये दोन्ही समुदायामध्ये काहीही होऊ शकते. त्यांना चिथावणी दिली जात आहे. राज्यात हनुमान चालिसा आणि भोंगे हे दोन मुद्दे सध्या चर्चेत आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. सविस्तर वाचाण्यासाठी येथे क्लिक करा.

इम्तियाज जलील यांची शायरीतून टीका - राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Raj Thackeray ) यांनी केली आहे. जलील यांनी शेरोशायरी अंदाजात राज ठाकरे ( Imtiaz Jaleel news Aurangabad ) यांच्यावर टिका केली. शायरी अंदाजात टिका - सियासात की दुकानो मे रोशनी के लिय मुल्क मेरा जलता, अशा आणि सियासत नफरतो के जखमो को भरणे नही देती, जब भी भरणे आता है जख्म वहा मख्खी बैठ जाती है, अशा अंदाजात त्यांनी टिका केली. तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक तेढ वाढवणे सुरू आहे. भोंगे काढण्याची मुदत एक दिवसाने वाढली. म्हणजे ते म्हणतात कार्यकर्त्यांनो तुम्ही करा आणि मी अयोध्येला जातो, म्हणजे केसेस कार्यकर्त्यांवर. ते मरणार हे फिरणार, अशी टीका जलील यांनी केली. सविस्तर वाचाण्यासाठी येथे क्लिक करा.

गृहमंत्री म्हणाले पोलिसांच्या अहवालानुसार कारवाईबाबत निर्णय - औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असा आरोप होत आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कालच्या सभेमध्ये फक्त पवार साहेब यांच्यावर टीका करणे आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा कसा, तेढ निर्माण कसा होईल याचाच प्रयत्न त्यांनी केला. कालच्या त्यांच्या भाषणाचे पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहे. त्याच्यातून आक्षेपार्ह विधान, अटी शर्तींचा भंग केला आहे की नाही ते सर्व बघून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त अहवाल राज्य सरकारला उद्या सादर करतील आणि उद्या मुंबईत बैठक घेतल्यानंतर या बैठकीमध्ये चर्चेअंती काय करावे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सविस्तर वाचाण्यासाठी येथे क्लिक करा.

  • No one incl Muslims opposed Hanuman Chalisa...Loudspeakers will be removed from temples& mosques.Appeal to all to maintain peace...Law is equal for all.If Raj Thackeray has said anything objectionable in his speech then action will be taken against him: Kishori Pednekar,Shiv Sena pic.twitter.com/gLumzbX5yU

    — ANI (@ANI) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर राज ठाकरे यांच्यावर नक्की कारवाई - हनुमान चालीसाला मुस्लिमांसह कोणीही विरोध केला नाही. मंदिर आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन. कायदा सर्वांसाठी समान आहे. राज ठाकरेंनी भाषणात आक्षेपार्ह काही बोलले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसारच लाऊडस्पीकरचा वापर करावा. विहित डेसिबल मर्यादेचे कोणी उल्लंघन केले तर लाऊडस्पीकर काढावा. मनसे कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये अन्यथा कोर्टात हजर राहण्यात आयुष्य वाया जाईल, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray on loudspeaker : भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नाही तर सामाजिक - राज ठाकरे

हेही वाचा - MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai : मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर; 5 जूनला जाणार दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.