ETV Bharat / city

तौक्ते चक्रीवादळामुळे परीक्षांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 जूनपासून पुनर्परीक्षा - Re examination from June 8

गेल्या महिन्यात अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला होतो.

mumbai university
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Jun 4, 2021, 8:56 PM IST

मुंबई - गेल्या महिन्यात अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला होतो. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थी परीक्षापासून वंचित राहिले होते. परीक्षापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 जूनपासून मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा - धक्कादायक : कोरोना वार्ड परिसरात राबताहेत अल्पवयीन मुले; कालच झाला फडणवीसांचा दौरा

शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 कृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. तसेच 18 ते 31 मेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमची पुनर्परीक्षा व व्दितीय वर्ष बीए, बीकॉमची नियमित व पुनर्परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेच्या दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे व इतर तांत्रिक कारणामुळे सिधुदुर्ग, रत्नागिरी, पालघरबरोबरच मुंबई, ठाणे, रायगड येथील काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. जे विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पुनर्परीक्षा 8 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षापासून वंचित राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असे असणार पुनर्परीक्षेचे वेळापत्रक-

परीक्षेस अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन लिंक विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठविली जाणार आहे. या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आयडॉलने पुनर्परीक्षेची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी ही पुनर्परीक्षा द्यावी असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.

हेही वाचा - वसई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.