मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी नोटीस आल्यानंतर संजय राऊत काही दिवस शांत राहतील, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र पुन्हा औरंगाबाद नामकरणावरून पाच वर्षे असताना भाजपाने काय केले, अयोध्या प्रयगराज नाव बदलले तेव्हा हे नाव ही बदलता आले असते, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच रश्मी ठाकरे यांना पत्र लिहू, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांनाही राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपाने 5 वर्षे काय केले?
महाविकास आघाडीत हा मतभेदचा विषय नाही आहे. विरोध असेल तर सगळे बसून हा प्रश्न सोडविला जाईल. बीजेपी काहीही बोलते फस्ट्रेशन बाहेर काढते. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू ह्रदय सम्राटच राहतील बाळासाहेब थोरात बोलताय पण हा प्रस्ताव नाही आहे. हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारायला हवा शिवसेना संभाजीनगरबाबत काय करणार ? असा प्रश्न राऊत विचार आहेत. भाजपाने 5 वर्षे काय केले? 5 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही अयोध्या प्रयगराज नाव बदलली त्यावेळेसच नाव बदलण्यात आलं असतं असेही राऊत यांनी सांगितले.
ताबडतोब पत्र लिहा
जर चंद्रकांत पाटील रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीत असतील तर बाप रे ताबडतोब लगेच लिहा. मला भीती वाटते त्यांची ते पत्र लिहित आहेत अशी बोचरी टीका राऊत यांनी पाटील यांच्यावर केली आहे.
शहराच्या नावावरून काही मतभेद नाही
शहराच्या नावावरून काही मतभेद असू शकत नाही, काँग्रेस नेते जे महाराष्ट्रत आहेत अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, त्यांचे प्रेम श्रद्धा ही औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर जास्त असणार आहे. प्रत्येक हिंदूंची श्रद्धा यावर आहे.
मला भीती वाटते त्यांची, ते पत्र लिहित आहेत, चंद्रकांत पाटलांवर राऊत यांची बोचरी टीका - letter to rashmi thakre
औरंगाबाद नामकरणावरून पाच वर्षे असताना भाजपाने काय केले, अयोध्या प्रयगराज नाव बदलले तेव्हा हे नाव ही बदलता आले असते, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच रश्मी ठाकरे यांना पत्र लिहू, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांनाही राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.