मुंबई : उद्योजक रतन टाटा यांनी कोरोना लस घेतली आहे. ट्विट करून टाटांनी याची माहिती दिली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचे रतन टाटा यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.
रतन टाटांचे ट्विट
'कोरोना लसीचा पहिला डोस मी आज घेतला. याबद्दल मी आरोग्य सेवेचे आभार व्यक्त करतो. लस घेणे अतिशय सुलभ आणि सुसह्य होते. लवकरच देशातील प्रत्येक व्यक्ती लस घेऊन सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करतो' असे ट्विट टाटांनी केले आहे.
देशातील नामवंत व्यक्तिंनी घेतली लस
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्यासह देशातील अनेक नामवंत व्यक्तिंनी कोरोनाची लस घेतली आहे.
सहव्याधी असलेल्यांचे लसीकरण
पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर देशभरात आता सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने कोरोनाची लस दिली जात आहे. देशात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून कोरोनावर मात करण्याचे सरकारचे ध्येय आहे.
हेही वाचा - चिंताजनक! राज्यात शुक्रवारी 15 हजार 817 नवे कोरोनाबाधित