मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी 19 बंगले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असल्याचे सिद्ध करुन दाखवा, राजकारण सोडेन असे आव्हान किरीट सोमैयांना दिले होते. याला आज किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंगल्यांचा टॅक्स भरल्याचे पुरावेच पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवले. त्यामुळे सोमय्या यांच्या या उत्तरावर राऊत काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, घर अस्तित्वात नाहीत तर मग कर कशाचा भरताय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितल्याचा दावा केला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत यांनी आपल्या नावाचा वापर का केला? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले नसतील तर त्याची घरपट्टी का भरली? असा सवाल त्यांनी केला. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमैय्या यांनी हे राऊत यांच्यावर पलटवार केले आहेत.
राऊतांचे आरोप फेटाळत वाधवान यांच्याशी संबंध नसल्याचा दावा केला
निकॉन कंपनी किरीट सोमय्यांची असून राकेश वाधवान त्यांचे पार्टनर असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र राऊतांचे हे आरोप फेटाळत वाधवान यांच्याशी संबंध नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर देताना व्यवसाय सर्वांचेच असतात असे म्हणत काहीसे गडबडल्याचे दिसले. आम्ही एक दमडीचीही चूक केलेली नाही. मुद्दा निकॉन कंपनीत आहे की, आणखी कोणत्या तो नाही. मुद्दा हा आहे की, राकेश वाधवान पार्टनर आहे तो आहे. मी स्पष्टच सांगितले तसे काहीही नाही.
राकेश वाधवान आणि माझा, माझ्या कुटुंबियांचा दमडीचा संबंध नाही
व्यावसाय सगळेच करतात. राकेश वाधवान हा प्रश्न आहे, तसे काहीच नाहीये. त्या कंपनीत राकेश वाधवान नाहीत. दूरपर्यंत संबंध नाही. तसेच, पीएमसी बँक, राकेश वाधवान आणि माझा, माझ्या कुटुंबियांचा दमडीचा संबंध नाही, अस म्हणत त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. मात्र, या प्रश्नांना उत्तर देताना सोमैया यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - Sanjay Raut Tweet : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच! राऊतांच्या ट्विटने पुन्हा राजकीय वादळ