ETV Bharat / city

Rashmi Thackeray in Action : रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात, निवडक आमदारांच्या पत्नीशी संपर्क - Chief Minister Uddhav Thackeray

शिवसेना पक्ष आणि सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनीही सहभाग घेतला ( Rashmi Thackeray enters the field) आहे. बंडखोर आमदारां मधील काही आमदारांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू (contacts the wife of selected MLAs) केला आहे.

Rashmi Thackeray
रश्मी ठाकरे
author img

By

Published : Jun 26, 2022, 12:19 PM IST

मुंबई: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता पक्ष आणि सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधीमंडळात कायदेशीर लढाई सुरू असतानाच पक्षीय पातळीवर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी भावनिक साद घातली जात आहे. त्याच सोबत बंडखोर आमदारांनी परत यावे यासाठी कधी इशारा तर कधी आवाहन केले जात आहे. अद्यापही बंडखोर आमदारांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केलेली नाही अथवा त्यांना गद्दार म्हणून संबोधले गेलेले नाही अजूनही पक्षाची दारे त्यांच्यासाठी उघडी असल्याचे नेते सांगत आहेत.

दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता पक्ष वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांच्या पत्नीशी त्या संपर्क साधत आहेत. यातही मुख्यत्वे आणि काही शिंदे कट्टर समर्थक असलेल्या आमदारांना त्यांनी वगळले आहे. उर्वरित आमदारांच्या पत्नींशी त्या संपर्क साधत आहेत. शिवसेनेत असलेले त्यांचे महत्त्व आणि शिवसेनेकडून त्यांना आतापर्यंत केलेली मदत, तसेच पक्ष अडचणीत असताना त्यांनी कसे पक्षासोबत राहिले पाहिजे याबाबत या आमदारांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही आमदारांच्या पत्नींनी रश्मी ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : शिवसेनेची बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.