ETV Bharat / city

अंजूमनच्या 'या' ग्रंथालयात आहे, उर्दूतील सर्वात‍ दुर्मिळ 'वाल्मिकी रामायण'

author img

By

Published : Sep 27, 2020, 10:20 AM IST

मुंबईतील अंजूमन इस्लामच्या इमारतीत इतिहासातील अनेक पाने जतन आहेत. येथील करिमी ग्रंथालयात विविध भाषेतील अत्यंत दुर्मिळ ग्रंथसंपदा संग्रही असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे या ठिकाणी उर्दू भाषेत भाषांतरीत झालेले आणि सर्वात दुर्मिळ असे वाल्मिकी रामयण देखील जनत करुन ठेवण्यात आले आहे.

उर्दूतील सर्वात‍ दुर्मिळ 'वाल्मिकी रामायण'

मुंबई - राजधानी मुंबईत सीएसटी स्थानकाशेजारी अगदी त्याच शैलीत अंजूमन इस्लामची इमारत उभी आहे. भारतीय शिक्षणाचा वसा घेतलेल्या या इमारतीने देशभरात आपले नावलौकिक केलेले असतानाच याच इमारतीतील अनेक गुपित अजूनही उजेडात आलेली नाहीत. याच इमारतीत असलेल्या करिमी ग्रंथालयात उर्दू, फारशी भाषेतील सर्वात जुनी आणि दुर्मिळ असलेली वाल्मिकी रामायणाची प्रत उपलब्ध आहे.

स्वातंत्र्यांच्या पूर्वीपासून उभ्या असलेल्या या इमारतीतील करिमी ग्रंथालयात केवळ उर्दूच नव्हे तर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, फारशी, पठाणी भाषा म्हणून ओळखली जाणारी पुस्तो, हिजरी, फारशी, आणि तुर्की भाषेतील अनेक पुस्तके आणि दस्तावेज येथे उपलब्ध आहेत. दुर्मिळ ग्रंथांमध्ये तब्बल ५ हजार २१ ग्रंथ या संस्थेने जतन करून ठेवले असून या सर्व ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

अंजूमनच्या 'या' ग्रंथालयात आहे

करिमी ग्रंथालयाची सुरुवात ही १९४७ पूर्वी तत्कालीन संस्था चालकांनी केली असली तरी येथे असंख्य दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा मात्र मागील साडेचारशे वर्षांपूर्वीपासूनची जतन करण्यात आली आहे. लखनौ येथील मुन्शी किशोरीलाल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली 'वाल्मिकी रामायण' (१८९६) याची उर्दू आणि सर्वात जुनी प्रत ही याच ग्रंथालयात उपलब्ध आहे. तसेच महाभारताची जुनी प्रत येथे पाहावयास मिळते. ‍१८८४ साली बरेलीच्या चंद्रगुप्त प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या 'ग्यान गीता' या पुस्तकाची दुर्मीळ प्रत, तसेच तुलसीदासाच्या मूळ रामायणाची फारसी, सिंधी आणि उर्दूमधील 'रामायण बक्का' या नावाने १८९३ साली प्रसिद्ध करण्यात आलेली दुर्मिळ प्रतही येथे जतन करण्यात आलेली आहे.

राज्यात कुठेही उपलब्ध नसलेले फारशी भाषेतील रामायणही येथे उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. हिंदू धर्माची अत्यंत महत्वाची दस्तावेज असलेली ही दुर्मिळ ग्रंथसंपदा चाळताना अनेक पुस्तकांची पानेही जर्रजर झालेली पाहायला मिळाली. तर काहींना वाळवीही लागल्याचे ही दिसून आले. त्यामुळे संस्थेने दखल घेऊन ही संपदा पुढील पिढीसाठी डिजिटायझेशनच्या रूपातही संग्रहीत केली आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे व्यवस्थापक सलील चौधरी यांनी दिली.

हिजरी भाषेचे सर्वात जुने पुस्तक-

करिमी ग्रथालयात तुर्कीच्या हिजरी भाषेतील 'अंहगे बुलबुले' नावाचे १२३२ सालचे शायरीचे अत्यंत जुने पुस्तकही येथे उपलब्ध आहे. तसेच 'हप्ताजबत' हे फारशीतील १२७९ चे पुस्तक. १२९५ मधील 'गुलजार कादरी' हे पुस्तक येथे पहावयास मिळतात. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशातील अनेक जुन्या उर्दू कवींच्या कवितांचा संग्रह येथे पाहावयास मिळतो. दरवर्षी या करिमी ग्रंथालयाला हजारो विद्यार्थी, संशोधक भेट देतात. संशोधक येथे येऊन अभ्यासही करत असतात, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी कॅप्टन सत्तार मोधक यांनी दिली.

उर्दू, फारशीतील नियतकालिकांचेही सर्वात जुने दस्तावेज

इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त उर्दू भाषेतील नियतकालिके ही उत्तर भारतातील अनेक शहरांतून प्रसिद्ध होत हेाती. त्यातील अनेक नियतकालिके येथे उपलब्ध आहेत. यात अखबारे आलम नावाचे १८९३ मध्ये प्रसिद्ध झालेले नियतकालिक येथे पाहता येते. त्यासोबत अवध अखबार (१८९३), ताजलअल अखबार (१८९५) आदी अनेक नियतकालिक येथे पाहावयास मिळतात. हा साहित्याचा दुर्मिळ ऐतिहासिक सांस्कृतिक खजिना जतन करण्याचे काम करिमी ग्रंथालयाकडून निरंतर करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.