ETV Bharat / city

मुंबईत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पाच कोटी रुपयेही लुबाडले - mumbai crime news

लग्नाचे आमिष देऊन पीडित महिलेवर सतत बलात्कार करून तिला 5 कोटी 19 लाख रुपयांना फसवण्यात आल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे.

ccrime
fसंग्रहित फोटो
author img

By

Published : Jun 19, 2021, 4:36 PM IST

मुंबई - लग्नाचे आमिष देऊन पीडित महिलेवर सतत बलात्कार करून तिला 5 कोटी 19 लाख रुपयांना फसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला मुंबई पोलिसांच्या अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.

  • मैत्रीचे रूपांतर प्रेमात मग लग्नाची दिले आमिष व केला बलात्कार -

मुंबई पोलिसांच्या अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये पीडित महिला तक्रारदाराने येऊन तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणातील पीडित महिला तक्रारदार ही व्यावसायिक असून, 2018 मध्ये तिचे तिच्या एका कॉमन मित्राद्वारे आरोपीशी ओळख झाली होती. या भेटीदरम्यान या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक एकमेकाला देऊन बोलण्यास सुरुवात केली. यानंतर काही दिवसांनी मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सदरच्या आरोपीने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत बलात्कार केला. भविष्यासाठी आपण व्यवसाय करण्याच्या विचारात आहोत आणि त्यासाठी मला 3 ते 3.50 कोटी रुपयांची गरज असल्याचं या महिलेला सांगितले. नंतर सदरच्या महिलेने आरोपीस 5 कोटी 19 लाख रुपये दिले असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

  • पीडितेचे नग्न फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट करण्याची दिली धमकी -

2019 मध्ये काही कारणावरून हे दोघेही एकमेकांपासून लांब गेल्यानंतर सदरच्या पीडित महिलेने आरोपीकडे तिने दिलेल्या पैशांची मागणी केली. दरम्यान, आरोपीने पैसे देण्यास नकार देत पीडित महिलेचे नग्न फोटो इंटरनेटवर व सोशल माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. यामुळे पीडित महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन याबद्दल तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयामध्ये आरोपीला हजर केल्यानंतर त्याची रवानगी 21 जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.