मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात युक्रेनमधून ( Indians coming from Ukraine at airport ) विद्यार्थी दाखल होत आहेत. या विद्यार्थांनी आपापल्या गावी परत जाण्याची सोय करण्यासाठी बुधवारपासून भारतीय रेल्वेने मुंबई विमानतळावर मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन ( Rail desk at airport ) केला आहे. त्याचा फायदा युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. पहिल्याच दिवशी विमानतळावर दाखल होणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना रेल्वेचे आरक्षित तिकीट काढून आपली गावे गाठली आहेत.
मुळगावी विनाकष्ट जाता यावेत - दानवे
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही ( operation Ganga by Indian gov ) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 183 भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेस IX 1202 हे विमान ( Air India Express plane in Mumbai ) आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. हे विमान तिथे अडकलेल्या प्रवाशांना घेऊन, रोमानियाच्या बुखारेस्ट येथून बुधवारी मध्यरात्री निघाले होते.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून युक्रेनमधून आलेल्या प्रवाशांचे स्वागत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी या सर्व प्रवाशांचे नातेवाईकदेखील विमानतळावर हजर होते. विदेशातून मायदेशी येणाऱ्या प्रवाशांना आपापल्या गावी परत जाण्याची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन केला आहे. राज्यनिहाय अशा या कक्षांद्वारे नागरिकांना त्यांच्या मुळगावी विनाकष्ट जाता यावे, या दृष्टीने त्यांना मदत केली जात असल्याचे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा-Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप
रेल्वे विभागांना सूचना -
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी जाण्याची नीट सोय केली जावी, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबई महानगर पालिकांकडूनही युक्रेन आणि रशिया येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांना जेवणाची आणि नाश्ताची सोय केली आहे. विशेष म्हणजे मुंबई राहणाऱ्या विद्यार्थ्यां घरापर्यत सोडून देण्यासाठी वाहनांचीसुद्धा सोय पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.