ETV Bharat / city

Home Minister Medal उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झालेली लेडी सिंघम - पोलीस निरीक्षक राणी काळे

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे यंदाचे केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असून ते प्रदान देखील करण्यात आले Home Minister Medal देशातील १५१ अधिकारी या पदकाचे मानकरी ठरले असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबईतील लेडी सिंघम असलेल्या सहाय्यकी पोलीस निरीक्षक राणी काळे यांना देखील त्यांच्या उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले आहे

पोलीस निरीक्षक राणी काळे
पोलीस निरीक्षक राणी काळे
author img

By

Published : Aug 15, 2022, 5:36 PM IST

मुंबई - १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे यंदाचे केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असून ते प्रदान देखील करण्यात आले. देशातील १५१ अधिकारी या पदकाचे मानकरी ठरले असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबईतील लेडी सिंघम असलेल्या सहाय्यकी पोलीस निरीक्षक राणी काळे यांना देखील त्यांच्या उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले आहे या लेडी सिंघम नवी मुंबई परिसरात अनेक ड्रग्ज माफियांवर कारवाई केली आहे या राणी काळे यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना सांगितले की पनवेल येथील २३३ किलो गांजा जप्त करून दोघांना अटक केली होती त्यांना दोन महिन्यांपूर्वी कोर्टाने दोषी ठरवून १३ वर्षांची शिक्षा आणि १ लाखाहून अधिक दंड आकारला या कारवाईसाठी मला केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाले असल्याचे राणी काळे यांनी सांगितले

पहिल्या परीक्षेतच यश मिळाले सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या राणी काळे या 2011 मध्ये एमपीएससीद्वारे महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या पहिल्या परीक्षेतच त्यांना यश मिळाले त्यांची पहिली पोस्टिंग पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे शहरात करण्यात आली होती त्यानंतर आता त्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्या मूळच्या इंदापूर येथील असून त्यांचे पती कृष्णा गोरे हे देखील पोलीस दलाचा भाग आहेत कृष्णा गोरे हे सध्या मानपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आजवर राणी काळे यांना 60 रिवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे शिवसेना नेते दीपक केसरकर गृहराज्यमंत्रीपदी असताना राणी काळे यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामकाजासाठी त्यांना 2017 मध्ये गौरविण्यात आलं होत 2018 मध्ये नवे शहर सन्मान पुरस्कार हा राणी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना देण्यात आला होता तसेच आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते देखील राणी काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

ड्रग्ज पेडलर्सचा कर्दनकाळ असलेल्या लेडी सिंघम लहानपानापासून खाकीचं आकर्षण आणि आदर राणी यांना असल्याने त्या पोलीस दलात सामील झाल्या पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात निर्भया अभियानात राणी यांनी मोलाची कामगिरी केली अत्यंत चिकाटीने आणि सचोटीने काम करणाऱ्या राणी काळे यांनी पुण्यात देखील अमलीविरोधी कारवाया केल्या आहेत आजवर त्यांनी ४४ केसेस आणि ६७ ड्रग्ज डिलर्सला बेड्या ठोकल्या आहेत तसेच कळंबोली येथून दहा किलो 365 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला लहू नामा कडव (55) असे पळालेल्या आरोपीचे नाव असून तो कळंबोली गावचा राहणारा आहे सदर ठिकाणी गांजाचा मोठय़ा प्रमाणात साठा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ निरिक्षक रविंद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली काळे यांच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला होता यावेळी लहू कडव हा गांजा घेवून त्याठिकाणी आला परंतु पोलिसांनी सापळा रचल्याची चाहूल लागताच त्याने मुद्देमाल सोडून पळ काढला ड्रग्ज पेडलर्सचा कर्दनकाळ असलेल्या लेडी सिंघम राणी काळे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाल्याने अजून मोठ्या कारवाया करण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याची त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले

हेही वाचा - Unique Friendship मृत्युशय्येवर असलेल्या मित्राची अखेरची इच्छा केली पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.