मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) रामराजे निंबाळकर ( Ramraje Nimbalkar ) आणि एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांना विधानपरिषदेची ( Legislative Council Election 2022 ) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Paitl ) यांनी माहिती दिली. ते आज (दि. 9 जून) अर्ज दुपारी भरणार आहेत.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची राज्यात रणधुमाळी सुरू आहे. 10 जूनला राज्यसभा निवडणूक ( Rajya Sabha Election ) संपताच 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक ( Legislative Council Election ) होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ( Maharashtra Legislative Council Election ) ही निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम ( MH Legislative Council elections program )
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जून
- अर्जाची छाननी 10 जून
- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 13 जून
- मतदान 20 जून, वेळ सकाळी 9 ते सायंकाळी चारपर्यंत
- मतमोजणी 20 जून सायंकाळी पाच वाजता
'असे' असणार जिंकून येण्याचे गणित - विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 आमदारांच्या मतांची गरज लागणार आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी आमदारसहीत त्यांचा आकडा 113 एवढा आहे. या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाच्या चार जागा विधान परिषदेवर सहज निवडून जाऊ शकतात. मात्र, भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केल्यामुळे पाचवा जागेसाठी त्यांना आपली सर्व ताकद पणाला लावून पुन्हा एकदा इतर लहान गट किंवा अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावावे लागणार आहे.
शिवसेनेचे 56 राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार विधान परिषदेत धाडले जातील. तर काँग्रेसकडून एक उमेदवार निश्चित विधान परिषदेत जाईल. मात्र, सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीलाही रस्सीखेच करावी लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मुंबईतील वांद्रे परिसरात 3 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 19 जण गंभीर जखमी