ETV Bharat / city

Ramdas Athawale And Raju Shetty : रामदास आठवले आणि राजू शेट्टी झळकणार 'या' मराठी चित्रपटात - मराठी चित्रपट राष्ट्र एक रणभूमी

शीघ्र कवी अशी रामदास आठवलेंची ( Ramdas Athawale) ओळख तर शेतकरी आंदोलन म्हंटल की राजू शेट्टींच (Raju Shetty ) नाव डोळ्यासमोर येत. महाराष्ट्राच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांनी राजकारणात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. आत हे दोघेही राजकारणातून थेट चित्रपटात एन्ट्री करणार आहेत.

Rashtra Ek Ranbhumi
राष्ट्र एक रणभूमी
author img

By

Published : Aug 3, 2022, 8:34 PM IST

मुंबई - आपल्या देशात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी नागरिक राष्ट्रप्रेमी झाल्याचे भासतात. म्हणजे प्रत्येक देशभक्त भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम असतेच परंतु त्या दिवशी ते प्रकट होत असते. असो. चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. 'राष्ट्र - एक रणभूमी' ( Rashtra Ek Ranbhumi ) हा असाच एक आगामी मराठी चित्रपट ( Marathi cinema ) आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.

वर्तमान काळातील राजकीय पटलावर सादर होणाऱ्या या चित्रपटात देशभक्तीची भावना जागृत करणारं कथानक पहायला मिळणार असल्याची 'राष्ट्र' या टायटलवरूनच सहज कल्पना येते. महाराष्ट्राच्या मातीतील राजकारणाला राष्ट्रीय पातळीवरील पॅालिटीक्सची जोड देत 'राष्ट्र'च्या माध्यमातून इंदरपाल यांनी मराठी सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात त्यांनी आजघडीला अतिशय ज्वलंत असणारा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. आजच्या प्रगत समाजात आरक्षणाची नेमकी भूमिका काय आहे याचा उहापोह करण्यासाठी या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी अवतरली आहे.

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव इत्यादी मराठीतील आघाडीच्या कलाकारांची फौज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. याखेरीज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( RPI Ramdas Athawale )आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी ( Raju Shetty ) हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही 'राष्ट्र'च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

कोरोनासारख्या महामारीसोबतच समोर आलेल्या सर्व संकटांवर मात करीत अखेर 'राष्ट्र' प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने निर्माते बंटी सिंग यांनी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. हा चित्रपट भारतीय राजकारणातील कच्चे दुवे समोर आणणारा असून, आरक्षण या मुद्द्यावर विचारमंथन करणारा असल्याने प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असल्याचं मत दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.महामारीमुळं लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारं टायटल असणारा ‘राष्ट्र - एक रणभूमी' हा चित्रपट २६ ऑगस्टच्या मुहूर्तावर म्हणजेच यंदा स्वातंत्र्यदिनाच्या नंतरच्या आठवड्यात रसिक दरबारी सादर होणार आहे.

हेही वाचा : Facebook-Instagram Content : फेसबुक-इंस्टाग्राम 'या' लोकांच्या दाखवणार अधिक पोस्ट सामग्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.