ETV Bharat / city

'हा मोदी-नितीश कुमारांचा करिष्मा, एनडीएला पुन्हा बहुमत दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे अभिनंदन' - एनडीएला बिहारमध्ये बहुमत रामदास आठवले प्रतिक्रिया न्यूज

बिहार निवडणुकीत महागठबंधनकडून नितीश कुमार आणि एनडीएवर मोठी टीका करण्यात आली. पण या टीकेला आता बिहारच्या जनतेने बहुमताच्या रूपाने उत्तर दिले आहे. जनतेने एनडीएला स्वीकारले असून महागठबंधनला नाकारले आहे, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले बिहार निवडणूक प्रतिक्रिया
रामदास आठवले बिहार निवडणूक प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 11, 2020, 1:10 PM IST

मुंबई - बिहार निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले असून याबद्दल बिहारच्या जनतेचे अभिनंदन आणि हार्दिक आभार, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बिहार निवडणूकीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर बिहारमध्ये मिळालेले हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर केलेल्या कामाचा तर नितीश कुमार यांनी मागील 15 वर्षात केलेल्या कामाचा करिष्मा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - दिवाळीत चीनी लायटिंगचाच बोलबाला, देशी लायटिंगपेक्षा तीनपट विक्री

एनडीएला बहुमत

बिहार निवडणुकीत महागठबंधनकडून नितीश कुमार आणि एनडीएवर मोठी टीका करण्यात आली. पण या टीकेला आता बिहारच्या जनतेने बहुमताच्या रूपाने उत्तर दिले आहे. जनतेने एनडीएला स्वीकारले असून महागठबंधनला नाकारले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक

बिहार निवडणूकीत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर मोठी जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने सोपवली होती. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडली. बिहारमध्ये जाऊन त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तेव्हा फडणवीस यांचा या यशात मोठा वाटा असल्याचे म्हणत आठवले यांनी फडणवीस यांचे ही कौतुक केले आहे. तर मोदी, नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - जर्किनवरून लावला चोराचा शोध.. 5 सोनसाखळ्यांसह अटक, वाहन चोरीचेही 6 गुन्हे उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.