मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजपा ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. त्यात भाजपा नेते राम कदम यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर उपोषण करत अर्णब यांना मुक्त करा व पत्रकारांची मुस्कटदाबी या सरकारने थांबवावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राम कदम यांनी खार ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर अशी पदयात्रा काढत अर्णब यांच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच आम्ही अर्णब गोस्वामींच्या सोबत आहोत, असे म्हटले.
अर्णब गोस्वामींच्या समर्थनात राम कदमांची खार ते सिद्धिविनायक पायी यात्रा अर्णब गोस्वामीला अटक राम कदम एकदम आक्रमक -इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत याविरोधात आंदोलन व समाज माध्यमांवर आवाज उठवण्याचे आवाहान केले आहे. त्यानुसार भाजपा नेते सर्वत्र आंदोलन व निदर्शने करत आहेत. अर्णब यांना अटक झाल्यापासून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तर, राम कदम यांनी मंत्रालयाबाहेर उपोषण केले आणि आज थेट पदयात्रा काढली आहे.
सिद्धिविनायकाजवळ कदमांचे साकडे
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही, म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्येप्रकरणी अडकवण्यात आले आहे. जी केस 2018 सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सूडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. ही भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आहे. त्यामुळे पत्रकारांची गळचेपी बंद करा व अर्णब यांना सोडून द्या, या मागणीसाठी आम्ही उपोषण केले. त्यानंतर आता आम्ही पदयात्रा काढत सिद्धिविनायकाजवळ साकडे घालत आहोत. त्यांची लवकर सुटका व्हावी, असे आमदार राम कदम यांनी म्हटले आहे. अर्णब गोस्वामींना तळोजा कारागृहात हलवले -
अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सरडा या तिघांना आज सकाळी अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्याने जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार तुरुंग महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार तिघांनाही तळोजा कारागृहात हलविले आहे.