ETV Bharat / city

Ram Kadam On Shivsena : शिवसेना नेत्यांनी पातळी पाहून धमकी द्यावी - राम कदम - Ram Kadam statement

स्वत:ची पातळी पाहून धमकी द्यावी असा इशारा राम कदम ( Ram Kadam On Shivsena ) यांनी दिला आहे. जे भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर झाले आहेत त्याविषयी उत्तर कधी देणार? दररोज तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा जनतेला लुटून भ्रष्टाचार केला आहे, असेही ते म्हणाले आहे.

ram sanjay
ram sanjay
author img

By

Published : Feb 9, 2022, 7:29 PM IST

मुंबई - स्वत:ची पातळी पाहून धमकी द्यावी असा इशारा राम कदम ( Ram Kadam On Shivsena ) यांनी दिला आहे. जे भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर झाले आहेत त्याविषयी उत्तर कधी देणार? दररोज तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा जनतेला लुटून भ्रष्टाचार केला आहे. त्या भ्रष्टाचाराला उत्तर कधी देणार? हा महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न आहे असे राम कदम यांनी म्हटले आहे.

राम कदम प्रतिक्रिया
काय म्हणाले आमदार राम कदम?
शिवसेना नेत्यांचा भ्रष्टाचाराच्या काळ्या चिठ्ठया कागदपत्रासहित समोर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी तुरुंगात जावे लागेल याबाबत धास्तावलेले हे नेते आता इतरांना धमक्या देत आहेत. स्वतःचे हात काळे झालेल्यांनी इतरांना धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. धमकी देण्याअगोदर याचा तरी विचार करायचा. जे भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावर झाले आहेत त्याविषयी उत्तर कधी देणार? दररोज तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा जनतेला लुटून भ्रष्टाचार केला आहे. त्या भ्रष्टाचाराला उत्तर कधी देणार? हा महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न आहे असे राम कदम यांनी म्हटले आहे.
अमित साटम प्रतिक्रिया
काय म्हणाले आमदार अमित साटम ?
संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही. घरात घुसायची भाषा करता, पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगले माहित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला तर हल्ले करायचे हे तुमचे काम आहे. त्या प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे.हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. तुम्हाला तुमच्याच भाषेत बोलायचे असल्यास प्रशासनाला बाजूला ठेवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.