मुंबई - मध्यप्रदेशमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा व काँग्रेस पक्षाचे मुखपत्र शिदोरी या मासिकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानकारक मजकुराविरोधात आमदार राम कदमांचे घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू आहे. यावेळी कमलनाथ सरकार व शिदोरी मासिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना सामना वृत्तपत्रामधून केंद्र सरकारवर व इतर प्रश्नांच्या मुद्द्यावर टीका करत होती. मात्र, शिवरायांचा अपमान व सावरकरांचा अपमान होत असतानाही सामनातून काही लिहील जात नाही. शिवसेना गप्प का अशी टीका भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर केला आहे. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी च्या गुंडा सोबतच्या वक्तव्यावर राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, सरकारने पुढे कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आज पोलिसांनी कमलनाथ सरकार व शिदोरी मासिकावर कारवाई करावी, अन्यथा पोलीस जर या सरकारला बळी पडत असतील तर आम्हाला राज्यपालांची भेट घेऊन कारवाईची मागणी करावी लागेल. जोपर्यंत पोलीस तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असे राम कदम म्हणाले. या ठिय्या आंदोलनात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या घाटकोपर परिसरातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.