मुंबई - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. तर, आता नवीन पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त
नवीन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याबद्दल
मुंबई पोलीस आयुक्त पदी हेमंत नगराळे यांची निवड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी 1988 च्या आयपीएस बॅचचे रजनीश सेठ यांची निवड करण्यात आली आहे. रजनीश सेठ यांनी या अगोदर लाचलुचपत विभागाच काम पाहिलेले असून, मुंबईवर झालेल्या 26 /11 च्या हल्ल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या फोर्स वनचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या बरोबरच मुंबईत तब्बल दोन वर्ष सहआयुक्त पदावर काम करत होते.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांना आज होवू शकते अटक