मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या एका जागेसाठी भाजपच्या वतीने राजहंस सिंह यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष, मंगल प्रभात लोढा, भाजप नेते आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
भाजपकडून राजहंस सिंहचा अर्ज सेना, भाजप कडून प्रत्येकी एक उमेदवारभाजपने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणाऱ्या एका जागेसाठी राजनाथ सिंह यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात विशेष करून मुंबई भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू होती. आज राजहंस सिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला. मुंबईतील विधान परिषदेच्या २ रिक्त जागेसाठी नगरसेवक मतदान करतात. त्यापैकी एक जागा शिवसेना तर दुसरी जागा भाजप लढवणार आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९७ तर भाजपचे ८१ नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार मतांच्या कोट्यानुसार सहज विजयी होतील यात शंका नाही. परंतु तिसऱ्या एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला तर ही चुरस वाढू शकते. परंतु ही शक्यता फार कमी आहे. आज राजहंस सिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम हे निवडून आले होते. यंदा त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
राजहंस सिंह उत्तर भारतीय चेहरा राजहंस सिंह हे मागील ४० वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेस मध्ये असताना त्यांनी आमदारकी सोबत, महापालिकेत नगरसेवक, विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत. मुंबईतील प्रश्नांचा चांगला अभ्यास त्यांना आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. हिंदी बरोबर मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. मुंबईमध्ये विशेष करून उत्तर भारतीय चेहरा भाजपकडे नव्हता, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश जरी केला असला तरी त्यांच्यावर आरोप असल्याकारणाने ते तेवढा प्रभाव उत्तर भारतीयांवर पाडतील का? याबाबत शंका आहे. राजहंस सिंह यांना उमेदवारी देऊन मुंबईत उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये पकड मजबूत करण्यासाठी भाजपने प्रयत्न केला आहे. अखेर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप टोकाचे प्रयत्न करताना दिसत आहे.
हेही वाचा - एसटी संपावर सामंजस्याने तोडगा काढणार - अनिल परब यांची माहिती; शरद पवार, अजित पवारांसोबत झाली बैठक