मुंबई विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या बेकायदा विद्यापीठांच्या यादीत illegal universities विविध राज्यातील 21 विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. स्वयंभू आणि बेकायदा शिक्षण संस्थामुळे शिक्षण क्षेत्रात याबाबत चर्चा सुरु झालीआहे. यूजीसीने बेकायदा घोषित केलेल्या यादीत महाराष्ट्रातील राजा अरेबिक विद्यापीठ नागपूरचा Raja Arabic University Nagpur समावेश आहे. त्यांच्याकडे पदवी देण्याचे अधिकार नाहीत. बेकायदा संस्थां आणि विद्यापीठांना उच्च शिक्षण संस्थेने मान्यता दिलेली नाही. त्यांना कोणतीही पदवी देण्याचे अधिकार नाहीत असे विद्यापीठ अनुदान आयोगाने आहे.
याबाबत शिक्षण तज्ञ अरविंद वैद्य यांच्या सोबत ईटीव्ही भारत ने संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की, सरकार इतके दिवस काय झोपले होते काय. यात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना फसवले गेले आहे. त्याची भरपाई कशी होणार. केवळ मान्यता रद्द करून कसे चालेल. अश्या संस्था चालकांना तुरुंगात पाठवायला हवे. मात्र राजकीय नेत्यासोब्त साटेलोटे असणारेच असे करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, अध्यात्मिक विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर, बडागावनी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी बेळगाव कर्नाटक, तर केरळामधील सेंट जॉन युनिव्हर्सिटी, बंगालमधील दोन विद्यापीठ तर उत्तर प्रदेशात चार विद्यापीठ, ओडिसा मध्ये दोन पुद्दुचेरी मध्ये एक तसेच आंध्र प्रदेशात देखील एक असे एकूण 21 विद्यापीठ बेकायदा घोषित केले आहेत.