ETV Bharat / city

Maharashtra Day Sabha : महाराष्ट्र दिनी राज, उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये रंगणार जुगलबंदी, आंबेडकरांचाही शांती मार्च

author img

By

Published : Apr 29, 2022, 9:50 PM IST

Updated : Apr 29, 2022, 10:33 PM IST

प्रत्येक राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते सभेच्या (Maharashtra Day Sabha) माध्यमातून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी (Maharashtra Foundation Day) राज्यात सभांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Sabha), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Sabha), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Sabha) यांच्या सभांच्या तोफा येत्या 1 मे रोजी एकमेकांवरच फुटणार आहेत. तर दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar March) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी राज्यात विविध ठिकाणी शांतता मार्च काढणार आहे.

file photo
फाईल फोटो

मुंबई - समाजा-समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य, मशिदीवरील भोंगे आणि एकामेकांच्या दारात हनुमान चालीसा वाचण्याची लागलेली चढाओढ यातच सर्व राजकीय नेते गुंग असलेले पाहायला मिळत आहेत. तर तेथेच प्रत्येक राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते सभेच्या (Maharashtra Day Sabha) माध्यमातून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी (Maharashtra Foundation Day) राज्यात सभांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Sabha), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Sabha), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Sabha) यांच्या सभांच्या तोफा येत्या 1 मे रोजी एकमेकांवरच फुटणार आहेत. तर दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar March) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी राज्यात विविध ठिकाणी शांतता मार्च काढणार आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी सर्वच मोठे नेते सभांमध्ये गुंतले असून, सभेच्या माध्यमातून एकमेकांना उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहेत.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरेंच्या सभेविरोधातील याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड

  • औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे ला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत काय बोलणार? याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा पठण केले जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे आता काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
  • देवेंद्र फडणवीस देणार सभेतून बूस्टर डोस - भाजपचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत बूस्टर डोस सभा घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून 1 मे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, यावेळी मुंबईत मोठ्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारला कडकडीत इशारा या सभेच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या सभेतून खास करून शिवसेनेला देवेंद्र फडणवीस टार्गेट करणार असल्याचे चित्र आहे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता बदल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे.
  • महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देणार करारा जवाब? - येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा ते समाचार घेणार असल्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे त्याच दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यावरून राज्य सरकारवरही टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभा केले आहेत. आता या सर्व टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे.
  • प्रकाश आंबेडकर काढणार 'शांती मार्च'- १ मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तर दुसरीकडे याच दिवशी म्हणजे १ मे रोजी प्रकाश आंबेडकर यांनी 'शांती मार्च' काढण्याची घोषणा केली आहे. येत्या ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकते, त्यामुळेच आम्ही १ मे रोजी राज्यात शांती मार्च काढणार असून, या मार्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक संघटनेचे स्वागत केले जाईल. पण कोणत्याही राजकीय पक्षाला या मार्चमध्ये जागा दिली जाणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे
  • राज ठाकरेंना खासदार जलील यांचे इफ्तार पार्टीचे आमंत्रण - राज ठाकरे यांनी सभेच्या आधी आमच्या सोबत येऊन इफ्तारला यावे, आपण सर्वजण मिळून बसूयात, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिले आहे. सभेच्या अनुषंगाने जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Last Updated : Apr 29, 2022, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.