ETV Bharat / city

Raj Thackeray Tweet : अक्षय्य तृतीयेला महाआरती करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन - राज ठाकरे अक्षय्य तृतीया ट्विट

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट ( Raj Thackeray Tweet On Akshaya Trutiya ) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'उद्या ईद आहे. मुस्लीम समाजाच्या सणांमध्ये आपल्याला कोणतेही विष कालावयचे नाही. तसेच त्यापूर्वी अक्षय्य तृतीया आहे, असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Raj Thackeray Tweet
Raj Thackeray Tweet
author img

By

Published : May 2, 2022, 3:31 PM IST

Updated : May 2, 2022, 5:28 PM IST

मुंबई - राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट ( Raj Thackeray Tweet On Akshaya Trutiya ) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'उद्या ईद आहे. मुस्लीम समाजाच्या सणांमध्ये आपल्याला कोणतेही विष कालावयचे नाही. तसेच त्यापूर्वी अक्षय्य तृतीया आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? - उद्या ईद आहे. कालच्या संभाजी नगरच्या सबेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम सामाजचा हा सण आंनदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे? - आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally ) यांनी सांगत, उत्तर प्रदेशात जर भोंगे काढले तर महाराष्ट्रात का नाही. सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तसेच या आधी पण लाऊड स्पीकरवर ( Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad ) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray Criticized BJP : 'हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपाकडून बाळासाहेबांची फसवणूक होताना मी स्वत: पाहिले'

Last Updated : May 2, 2022, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.