ETV Bharat / city

Raj Thackeray Threat Call : राज ठाकरेंना धमकीचे फोन, Z+ सुरक्षा देण्याची मनसेची मागणी - राज ठाकरे मशीद भोंगा वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Threat Call) यांना धमकीचा फोन आल्याची माहिती आता समोर आली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ( Mosque Loudspeaker issue in Maharashtra ) उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. पण त्या अल्टिमेटमला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. धमकीचे फोन पाहता राज ठाकरे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता मनसेकडून केली जात आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Apr 18, 2022, 6:46 PM IST

Updated : Apr 18, 2022, 7:48 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Threat Call) यांना धमकीचा फोन आल्याची माहिती आता समोर आली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे (Mosque Loudspeaker) उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. पण त्या अल्टिमेटमला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. पण तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. पण त्यांच्या याच मुद्द्यावरुन त्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. धमकीचे फोन पाहता राज ठाकरे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता मनसेकडून केली जात आहे.

हेही वाचा - 1 मे ला औरंगाबादमध्ये जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येत; राज ठाकरेंची घोषणा

सुरक्षा वाढवा, मनसे नेत्यांची मागणी- राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यांना सतत येणाऱ्या धमक्या व विषयाचे गांभीर्य लक्षात घेता राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात ( mns demand z plus security ) यावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची तयारी सुरू केल्याची ( raj thackeray on Mosque Loudspeaker ) माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम देत त्यांनी म्हटले आहे की, तोपर्यंत लाऊडस्पीकर न काढल्यास त्यांचे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करतील.

उद्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक - त्यानंतर आज (18 एप्रिल, सोमवार) राज्य सरकारकडून असे आदेश देण्यात आले की, यापुढे मंदिर असो की मशीद, लाऊडस्पीकर लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर आता राज ठाकरे यांनी उद्या त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा देणार - राज ठाकरे 5 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येला जाणार तेव्हा उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Hanuman Chalisa Recitation : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण

Last Updated : Apr 18, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.